बबलू हकीम यांचा पुढाकार : रायपुरात होणार पुढील उपचारअहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील पाच वर्षीय चिमुकली रेवती पंदिलवार हिला हृदयविकाराने ग्रासले आहे. तिच्या पुढील उपचारासाठी अहेरीचे सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी मंगळवारी आर्थिक मदत दिली. रेवती ही गरीब कुटुंबातील मुलगी असून तिला हृदयविकाराने ग्रासल्याने कुुटुंबीयांसमोर औषधोपचाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. सदर बाब माहित होताच सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी वेलगूर येथे रेवतीच्या घरी जाऊन तिचे वडील विनोद पंदिलवार यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द केली. पुढील उपचारासाठी रेवतीला रायपूर येथील सत्यसाई हार्टकेअर हॉस्पिटल येथे नेण्यात येणार आहे. आर्थिक मदत दिल्याबद्दल पंदिलवार कुटुंबीयांनी बबलू हकीम यांचे आभार मानले. यावेळी बबलू हकीम यांनी रेवतीच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. बबलू हकीम यांच्याकडून आर्थिक मदत मिळाल्यामुळे रेवतीवर औैषधोपचार करणे तिच्या कुटुंबीयांना शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)
आजारग्रस्त रेवतीला आर्थिक मदत
By admin | Updated: November 9, 2016 02:35 IST