शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अखेर ‘त्या’ गाेदामांचा वीजपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 05:00 IST

फेब्रुवारी २०२२ चे सदर तीनही मीटरचे एकूण वीज बिल ७ हजार ४० रुपये हाेते. सदर बिलाचा भरणा करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने ७ हजार ४० रुपये इतक्या रकमेचा धनादेश महावितरणच्या कार्यालयाला दिला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हा चेक बॅंकेत जाऊन २३ मार्चला वटविला. मात्र, सदर तीन गाेदामांच्या वीज बिलांचा भरणा न करता पाेटेगाव मार्गावरील निवडणूक विभागाच्या वापरात असलेल्या एकाच गाेदामाचे वीज बिल भरण्यात आला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दाेन ते तीन महिन्यांचे वीज बिल थकल्यानंतर ‘महावितरण’चे कर्मचारी संबंधित इमारतीच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करतात. मात्र, वीज बिलाचा भरणा करण्यासाठी महसूल विभागाने दिलेला धनादेश वटविण्यात आला. त्यानंतरसुद्धा महावितरणच्या वतीने महसूल विभागाच्या शासकीय धान गाेदामाच्या तीन मीटरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जवळपास एक महिना वीजपुरवठा खंडित हाेता. दरम्यान, महसूल विभागाच्या अन्न व पुरवठा निरीक्षकांनी कानउघाडणी करताच सदर गाेदामाचा वीजपुरवठा नुकताच पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. गडचिराेली येथील तहसील कार्यालयाअंतर्गत एकूण चार शासकीय गाेदामे आहेत. त्यापैकी तीन गाेदाम अन्न व पुरवठा विभागातर्फे शासकीय धान गाेदाम म्हणून वापर केला जात आहे. या सर्व गाेदामांची देखरेख तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून केली जाते. दरम्यान, फेब्रुवारी २०२२ चे सदर तीनही मीटरचे एकूण वीज बिल ७ हजार ४० रुपये हाेते. सदर बिलाचा भरणा करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने ७ हजार ४० रुपये इतक्या रकमेचा धनादेश महावितरणच्या कार्यालयाला दिला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हा चेक बॅंकेत जाऊन २३ मार्चला वटविला. मात्र, सदर तीन गाेदामांच्या वीज बिलांचा भरणा न करता पाेटेगाव मार्गावरील निवडणूक विभागाच्या वापरात असलेल्या एकाच गाेदामाचे वीज बिल भरण्यात आला. महावितरणच्या या चुकीमुळे पंचायत समितीनजीकच्या तीनही शासकीय गाेदामातील कामगारांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला, प्रसंगी अंधाराचा सामना करावा लागला. या समस्येच्या अनुषंगाने तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून हा घाेळ दुरूस्त करण्याची मागणी केली. पुरवठा निरीक्षक बारदेवाड यांनी कार्यालय गाठून कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. 

मानवाधिकार कायद्याच्या धाकाने महावितरण नरमले

-    फेब्रुवारी महिन्याचा वीज बिलाचा भरणा करण्यासाठी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात महावितरणला धनादेश देण्यात आला. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे भलत्याच मीटरचे वीज बिलाचे पैसे ‘त्या’ धनादेशातून वसूल करण्यात आले. मात्र भलत्याच मीटरचे बिल भरले.

-    महसूल विभागाने धनादेशासाेबत पत्र जाेडून ‘त्या’ तीन मीटरच्या वीज बिलाचा भरणा करावा, असा उल्लेख केला. असे असून सुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या तीन मीटरचे वीज बिल न भरता भलत्याच वीज बिलाचा भरणा केला. दरम्यान पुरवठा निरीक्षकांनी महावितरण कार्यालय गाठले. 

-    उकाड्यामुळे व अंधारामुळे गाेदामात कार्यरत कर्मचारी व कामगारांना काेणताही धाेका झाल्यास आपण मानवाधिकार कायद्याचा आधार घेऊन कारवाई करण्यास भाग पाडणार, अशी तंबी देताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्या तीन वीज मीटरचा वीज पुरवठा सुरू केला.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण