शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अखेर न.प.ची सभा झाली ऑफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

गडचिराेली नगर परिषदेची यापूर्वीची सर्वसाधारण सभा २६ डिसेंबर २०१९ राेजी पार पडली हाेती. वर्षभरापासून सभा न झाल्याने नवीन विकासकामांना ब्रेक लागला हाेता. अनेक अडथळ्यानंतर ११ डिसेंबर राेजी ऑनलाईन सभा निश्चित करण्यात आली. मात्र ऑनलाईन सभेला बहुतांश नगरसेवकांनी विराेध दर्शविला. इतर विभागांच्या सभा सभागृहात हाेत आहेत तर गडचिराेली नगर परिषदेची सभा सभागृहात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात काय अडचणी आहेत? असा प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित केला जात हाेता.

ठळक मुद्देवर्षभरानंतर मिळाली संधी : नगरसेवकांचा मनसुबा पूर्ण, अनेक महत्वाच्या कामांना मंजुरी

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ११ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने आयाेजित केली हाेती. पण इंटरनेट नेटवर्क काम करीत नसल्याने अखेर ही सभा ऑफलाईन पद्धतीने नगराध्यक्ष यांच्या कक्षात पार पडली. ही सभा ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी यासाठी बहुतांश नगरसेवक आग्रही होते. अखेर त्यांचा मनसुबा पूर्ण झाला.गडचिराेली नगर परिषदेची यापूर्वीची सर्वसाधारण सभा २६ डिसेंबर २०१९ राेजी पार पडली हाेती. वर्षभरापासून सभा न झाल्याने नवीन विकासकामांना ब्रेक लागला हाेता. अनेक अडथळ्यानंतर ११ डिसेंबर राेजी ऑनलाईन सभा निश्चित करण्यात आली. मात्र ऑनलाईन सभेला बहुतांश नगरसेवकांनी विराेध दर्शविला. इतर विभागांच्या सभा सभागृहात हाेत आहेत तर गडचिराेली नगर परिषदेची सभा सभागृहात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात काय अडचणी आहेत? असा प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित केला जात हाेता. याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन सभा ऑफलाईन घेण्याचे  निर्देश नगर परिषदेला द्यावे, अशी मागणी केली. मात्र सभा ऑनलाईनच घेण्याचे शासनाचे  निर्देश आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे काहीही पर्याय नसल्याने ऑनलाईन सभेस नगरसेवक तयार झाले होते.शुक्रवारी दुपारी १२ वाजता ऑनलाईन सभेचे नियोजन करण्यात आले. नगरसेवकांना नगर परिषदेच्या इमारतीतच वेगवेगळ्या विभागांमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली हाेती. मात्र बहुतांश नगरसेवक बांधकाम  विभागातच बसले हाेते. नगराध्यक्ष व तीन सभापती नगराध्यक्षांच्या कक्षात हाेते. चार नगरसेवक ऑनलाईन उपस्थित हाेते. दाेन नगरसेवक मात्र सभेला अनुपस्थित हाेते. 

सभेत इंटरनेटचा व्यत्ययठरल्याप्रमाणे दुपारी १२ वाजता सभेला झुम मिटींग ॲपवर सुरूवात झाली. सर्वप्रथम नगर सेवकांच्या हजेरीला सुरूवात झाली. हजेरी सुरू असतानाच इंटरनेट स्लाे झाल्याने एकमेकांचा आवाज येत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी करण्यास सुरूवात केली. यावर ताेडगा काढून सभा नगराध्यक्षांच्या सभागृहात ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे ठरविण्यात आले. उपस्थित नगरसेवकांच्या अनुमतीने अखेर ऑफलाईन पद्धतीने सभागृहात दुपारी १ वाजतापासून सभेला सुरूवात झाली.

रात्री उशिरापर्यंत चालली सभासभेत एकूण ७२ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले हाेते. दुपारी १ वाजता सुरू झालेली सर्वसाधारण सभा रात्री ८ वाजेपर्यंत सुरूच हाेेती. अनेक विषयांवर सभेत खमंग चर्चा झाली. शुक्रवारच्या सभेत काही विषय अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्या विषयांवर समाेरासमाेर चर्चा हाेणे आवश्यक हाेते. त्यामुळेच सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यास नगरसेवकांचा  विराेध हाेता, असे नगरसेवकांनी सांगितले. दरम्यान या सभेत काेणते निर्णय झाले, याबाबतची माहिती मिळू शकली नाही.