शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ४३ दिवसानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे, ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर

By दिगांबर जवादे | Updated: June 7, 2023 18:16 IST

तेलंगणाच्या बॅरेजमध्ये गेली आहे जमीन 

गडचिराेली : तेलंगणा सरकारच्या वतीने सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा बॅरेजमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा, यासाठी सिरोंचा तहसील कार्याालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. ४३ दिवसांपासून आंदोलन सुरूच होते. राज्य सरकारने यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बुधवारी आंदोलन मागे घेण्यात आले.

तेलंगणा सरकाने गोदावरी नदीवर पाच वर्षांपूर्वी बॅरेज बांधले आहे. या बॅरेजमध्ये सिरोंचा तालुक्यातील १२ गावांमधील शेतकऱ्यांची १२८ हेक्टर जमीन गेली आहे. मात्र याचा मोबदला देण्यात आला नाही. तेलंगणा सरकार जर नुकसान देणार नसेल तर महाराष्ट्र शासन याचा मोबदला देईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते. मात्र अनेक दिवस होऊनही मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासून आंदोलन सुरू केले होते. पैसे देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे, असे सांगीतले जात होते. मात्र जोपर्यंत मोबदला मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. 

या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ११ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. उर्वरित २६ कोटी रुपये लवकरच दिले जाणार आहेत. माजी मंत्री तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी सिरोंचा येथे जाऊन आंदोलकांना लिंबू पाणी पाजले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या इतरही अडचणी जाणून घेतल्या, त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शोभाताई फडणवीस यांनी दिले.

टॅग्स :agricultureशेतीGadchiroliगडचिरोलीShobha Fadnavisशोभाताई फडणवीसDamधरण