शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

कुरखेडा तालुक्यात होणार चित्रपटाचे चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST

देसाईगंज येथे झाडीपट्टी रंगभूमी आहे. या रंगभूमीतील शेकडाे कलावंत नाटकात काम करतात. हे कलावंत चित्रपटातही काम करू शकतात. त्यामुळे यातील काही कलावंतांना या चित्रपटात घेतले जाईल, अशी माहिती दिग्दर्शकांनी दिली. ‘निबंध’ हा चित्रपट सामाजिक विषयावर असून, तीन लहान मुलांच्या जीवनावर आधारित असल्याची माहिती दिग्दर्शकांनी दिली.

ठळक मुद्देस्थानिक कलावंतांना मिळणार संधी : दिग्दर्शकाकडून गुरनोली परिसरात पाहणी

सिराज पठाणलाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : झाडीपट्टी रंगभूमीसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही मराठी चित्रपटांचेही शूटिंग झाले आहे. आता अनेक वर्षांनंतर आणखी एक चित्रपट तयार होऊ घातला असून, त्याच्या शूटिंगसाठी चित्रपटाचे दिग्दर्शक व काही कलावंतांनी कुरखेडा तालुक्यातील गुरनाेली परिसराला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी ‘निबंध’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.कुरखेडा तालुक्यातील अनेक ठिकाणे नैसर्गिक साैंदर्याने नटली आहेत. या नैसर्गिक साैंदर्याने मुंबईच्या कलावंतांना नेहमीच भुरळ घातली आहे. चित्रपट दिग्दर्शक संजीव माेरे, कलावंत देवेंद्र दाेडके, प्रा.डाॅ.शेखर डाेंगरे, स्थानिक कलावंत किरपाल सयाम यांनी गुरनाेली गावाचा परिसर, शासकीय विश्रामगृह व पाेलीस स्टेशनला भेट देऊन साेईसुविधांची पाहणी केली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांची भेट घेऊन चित्रीकरणाच्या दरम्यान सहकार्य करण्याचे आवाहन केले. देसाईगंज येथे झाडीपट्टी रंगभूमी आहे. या रंगभूमीतील शेकडाे कलावंत नाटकात काम करतात. हे कलावंत चित्रपटातही काम करू शकतात. त्यामुळे यातील काही कलावंतांना या चित्रपटात घेतले जाईल, अशी माहिती दिग्दर्शकांनी दिली. ‘निबंध’ हा चित्रपट सामाजिक विषयावर असून, तीन लहान मुलांच्या जीवनावर आधारित असल्याची माहिती दिग्दर्शकांनी दिली.

लाल सलाम व डाॅ.प्रकाश बाबा आमटे नंतर आता ‘निबंध’भामरागड तालुक्यात यापूर्वी लाल सलाम व डाॅ.प्रकाश बाबा आमटे या  दाेन चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. ‘लाल सलाम’ हा हिंदी चित्रपट असून, नक्षलवाद व स्थानिक आदिवासींच्या जीवनावर तो आधारित आहे. हेमलकसा येथील लाेकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक डाॅ.प्रकाश आमटे यांच्या जीवनावरही मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रपटात डाॅ.प्रकाश आमटे यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केली, तर डाॅ.मंदाकिनी आमटे यांची भूमिका साेनाली कुलकर्णी यांनी केली. त्यानंतर, आता ‘निबंध’ नावाचा चित्रपट तयार झाल्यास लॉकडाऊनच्या काळात अवकळा आलेल्या झाडीपट्टी कलावंतांच्या आशा पुन्हा पल्लवित होतील.

 

टॅग्स :cinemaसिनेमा