शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तीन ठिकाणी भरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:45 IST

शासनाकडून प्राप्त झालेल्या तब्बल तीन कोटी रूपयांच्या निधीतून येथील हनुमान वार्डालगतच्या आठवडी बाजारात सिमेंट काँक्रीट ओटे, रोड, नाली व शेडचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने आठवडी बाजाराच्या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकाम सुरू झाल्याचा परिणाम : विक्रेत्यांसह ग्राहकांनाही झाला मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाकडून प्राप्त झालेल्या तब्बल तीन कोटी रूपयांच्या निधीतून येथील हनुमान वार्डालगतच्या आठवडी बाजारात सिमेंट काँक्रीट ओटे, रोड, नाली व शेडचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने आठवडी बाजाराच्या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजी रविवारी येथील बोरमाळा नदी घाट रस्ता, लगतची शेतजमीन तसेच चंद्रपूर मार्गावरील नगर भवन परिसरात तुटक-तुटक स्वरूपात आठवडी बाजार भरला. एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळाला नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. बाजाराची जागा बदलल्याने काही विक्रेतेही व्यवसाय मंदावल्याचे सांगत होते.आठवडी बाजाराच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्याच्या उद्देशाने नगर पालिका प्रशासनाच्या वतीने नवीन जागेत बाजार भरविण्यासाठीच्या हालचाली वाढल्या. दरम्यान मुख्याधिकारी संजीव ओहोड यांनी विक्रेत्यांची बैठक लावून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विक्रेत्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून नगर भवनच्या जागेत बाजार भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २४ डिसेंबरला पालिकेच्या वतीने नगर भवनच्या प्रवेशद्वारावर सूचनाफलक लावून नगरभवनच्या जागेत बाजार भरण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर जागा आरक्षित करण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ वाढली. मात्र दरम्यान काही कारणास्तव गडचिरोलीचा आठवडी बाजार जुन्याच जागेत भरणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी शनिवारी माध्यमांना कळविले. त्यानंतरही रविवारी काही विक्रेत्यांनी जुन्या बाजाराच्या परिसरात बोरमाळा मार्गावर तसेच लगतच्या शेतात दुकाने लावली. चंद्रपूर मार्गालगत एजन्सीच्या परिसरात विक्रेत्यांनी आपली दुकाने लावली. काही दुकानदारांनी नगर पंचायतच्या भवनात जागा पकडून त्या ठिकाणी मालाची विक्री केली. एकूणच आठवडी बाजाराची जागा बदलल्याने ग्राहकांना पायपिट करावी लागली. आठवडी बाजाराचे ठिकाण बदलल्याने अनेकांना त्रास झाल्याचे कित्येक जण बोलून दाखवत होते. आठवडी बाजाराच्या सौंदर्यीकरणाचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यात काही अडचणी येत आहेत.वाहन पार्किंग व्यवस्थाही विस्कळीतरविवारच्या आठवडी बाजार वेगवेगळ्या तीन ते चार ठिकाणी भरल्यामुळे दुचाकी वाहन पार्र्किंग व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली होती. काही ग्राहकांनी थेट बोरमाळा मार्गावर वाहने नेली. नगर पंचायत भवन परिसरातही वाहने अस्ताव्यस्त स्थितीत लावण्यात आली होती. एकूणच बाजाराची जागा बदलल्याने अनेकांना त्रास झाला.