शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पाचही बालिका विद्यालयाची निकालात भरारी

By admin | Updated: June 24, 2015 02:36 IST

जिल्ह्यात पाच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. या विद्यालयाचा सत्र २०१४- १५ चा दहावीचा निकाल सरासरी ९४.२३ टक्के लागला

शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती : सरासरी ९४.२३ टक्के निकालगडचिरोली : जिल्ह्यात पाच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. या विद्यालयाचा सत्र २०१४- १५ चा दहावीचा निकाल सरासरी ९४.२३ टक्के लागला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे यांनी ‘लोकमत’ला मंगळवारी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा, भामरागड, अहेरी, एटापल्ली व सिरोंचा येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहेत. या विद्यालयामध्ये शाळाबाह्य, दारिद्र्य रेषेखालील स्थलांतरित पालकांच्या मुली, अनाथ, अपंग, एकल पालकत्व असलेल्या मुलींना शिक्षण दिले जाते. मुलींची इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची व निवासाची सोय केलेली आहे. या शाळांमधील १०४ मुली दहावीत शिक्षण घेत होत्या. त्यापैकी १०३ मुलींनी एसएससी परीक्षा दिली असून ९८ मुली उत्तीर्ण आहेत. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्लीचा निकाल १०० टक्के आहे, सिरोंचा ९५.२४, अहेरी ९४, भामरागड ९१.६६, धानोरा ८९.४५ टक्के निकाल लागला आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्लीची पल्लवी जेंगठे ही विद्यार्थिनी जिल्ह्यातील पाचही विद्यालयांतुन ७३.६० टक्के गुण घेऊन पहिली आली आहे. धानोरा येथील शाळेत १९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. १७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. भामरागड येथे २४ विद्यार्थिनींपैकी २२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. अहेरी येथे १८ विद्यार्थिनींपैकी १७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. एटापल्ली येथे २२ विद्यार्थिनींपैकी २२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. सिरोंचा येथे २० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यात एकूण १०३ पैकी ९८ विद्यार्थिनी पाचही कस्तुरबा गांधी शाळेतून उत्तीर्ण झाल्या आहेत. ३१ विद्यार्थिनी प्रथम श्रेणी, ४३ विद्यार्थिनी द्वितीय श्रेणी व २४ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या, असल्याची माहिती शिक्षणाधिकारी साखरे यांनी दिली. या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, जिल्हा समन्वयक एल. डी. चौधरी आदींनी कौतुक केले आहे.