शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

 महिला मृत्यू प्रकरण: वैद्यकीय अधिकारी निलंबित; 'टीएचओं'ना कारणे दाखवा

By संजय तिपाले | Updated: December 14, 2023 20:29 IST

धानोरा तालुक्यातील कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत १३ डिसेंबर रोजी जि.प. सीईओ आयुषी सिंह यांनी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास तडकाफडकी निलंबित केले. कारवाफा  प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ डिसेंबरला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर झाले. यात कारवाफा येथील साधना संजय जराते (२३) यांची शस्त्रक्रिया झाली होती. दोन दिवसांनतर अचानक त्यांची तब्येत खालावली. जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर १० डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक चौकशीत हलगर्जीपणाचा ठपका ठेऊन कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश जांभुळे यांना जि.प.सीईओ आयुषी सिंह यांनी निलंबित केले. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसह पाच आरोग्यकर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. याशिवाय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सखाराम हिचामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जयंत पाटील, छगन शेडमाके यांचे निवेदनदरम्यान, साधना जराते (२३) यांच्या मृत्यूनंतर आरोग्यव्यवस्थेतील निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांची भेट घेऊन अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला तर काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांना निवेदन देत या घटनेकडे लक्ष वेधले होते. कुटुंबास तातडीची नुकसान भरपाईकुटुंब नियोज शस्त्रक्रियेदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाल्यास महिलेच्या कुटुंबास दोन लाखांची नुकसान भरपाई दिली जाते. यानुसार साधना जराते यांच्या कुटुंबास तातडीने ५० हजार रुपयांचे सहाय्य केले असून दोन मुलांच्यानावे उर्वरित दीड लाख रुपये जमा केले जाणार आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीhospitalहॉस्पिटल