शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना वाचविणाऱ्या युवकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:42 IST

तालुक्यातील नंदीगाव नाल्यावर नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानकपणे नाल्याचे पाणी वाढल्याने गडचिरोली-हैद्राबाद ही बस त्या नाल्यात बुडण्याच्या मार्गावर होती. दरम्यान स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्व प्रवाशांना या बसमधून सुरक्षित बाहेर काढले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आश्वासन : शौर्य पुरस्कारासाठी राज्य शासनाकडे शिफारस करणार

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील नंदीगाव नाल्यावर नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानकपणे नाल्याचे पाणी वाढल्याने गडचिरोली-हैद्राबाद ही बस त्या नाल्यात बुडण्याच्या मार्गावर होती. दरम्यान स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्व प्रवाशांना या बसमधून सुरक्षित बाहेर काढले. एवढ्यामोठ्या संकटातून प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या नंदीगाव, तिमरम, गुडडीगुडम येथील १२ आदिवासी युवकांचा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते शुक्रवारी अहेरीच्या राजमहालात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सदर युवकांना रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य सरकारतर्फे या बारा युवकांना शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी लवकरच शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी दिले.नंदीगाव, तिमरम, गुड्डीगुडम या तीन गावातील विनोद करनम, श्रीकांत पेंदाम, सतीश पेंदाम, आनंदराव मडावी, राकेश सडमेक, श्रीकांत सडमेक, रुपेश पेंदाम, श्रीकांत सिडाम, नरेंद्र सडमेक, मुनेश्वर सिडाम, प्रमोद कोडापे, प्रभू कुसराम आदी बारा युवकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. समाज कल्याण सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, बस आगार व्यवस्थापक युवराज राठोड, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, फिरोज शेख, गुड्डू ठाकरे यांच्यासह भाजपचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळGadchiroliगडचिरोली