काँग्रेस कमिटी व सामाजिक संघटनांचा पुढाकार आरमोरी : तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व विविध संघटनांच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. आनंदराव गेडाम यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सभापती आनंदराव आकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर वनमाळी, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, रामभाऊ हस्तक, देसाईगंजचे पं. स. सदस्य परसराम टिकले, मनोज अग्रवाल, पं. स. सभापती सविता भोयर, विलास ढोरे, केशव गेडाम, दत्तू सोमनकर, सुभाष सपाटे, मिलींद खोब्रागडे, श्रीनिवास आंबटवार, अमिन लालानी, बब्बू ताडाम, आशा तुलावी, नितीन राऊत, जयंत हरडे, शरद मुळे, प्रभाकर टेंभुर्णे, मनीषा दोनाडकर, यज्ञकला ठवरे, नरेंद्र टेंभुर्णे, नम्रता टेंभुर्णे, जितेंद्र रामटेके, मोहन भुते, भुपेश कोलते, टिकेश कुमरे, महादेव मडकाम, गणपती वडपल्लीवार, नामदेव सोरते, दिलीप घोडाम, बेबी सोरते, रोहित ढवळे, राजू बुल्ले, नंदू खानदेशकर, नादीर सय्यद, साबीर शेख, प्रवीण रहाटे, संध्या नैताम, पुंडलिक घोडाम, चिंतामन ढवळे, प्रकाश जौंजाळकर, मुखरू देशमुख, किरणशहा दुगा, तुळशीदास काशिकर उपस्थित होते. संचालन रवींद्र नैताम तर आभार मिलींद खोब्रागडे यांनी मानले. यावेळी शेकडो कार्यकर्ते हजर होते. (वार्ताहर)
आरमोरीत आनंदराव गेडाम यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 01:56 IST