शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोषपूर्ण ब्रेकरमुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:01 IST

गतीरोधक तयार करताना तो व्यवस्थित असणे आवश्यक आहे. मात्र वैरागडात तयार करण्यात आलेला गतिरोधक अतशिय दोषपूर्ण आहे. दोन्ही बाजुला उतार दिला नाही. एखाद्या तलावाच्या पाळीप्रमाणे रस्त्यावर उंचवटा तयार करून ठेवला आहे. गतिरोधकावरून वाहन नेताना वाहनाची चाके एकदम गतिरोधकाला जाऊन धडकतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत.

ठळक मुद्देवैरागड येथील गतिरोधक : विद्यार्थ्यांना धोका; सपाटीकरण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : येथील जुन्या बाजार चौकापासून ते बसस्थानकादरम्यान ३०० मीटरच्या सिमेंट रस्त्याचा दोन्ही टोकावर दोषपूर्णरित्या ब्रेकरचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात वाढले आहेत. विद्यार्थ्यांचाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्यावर गतीरोधक तयार करण्याचे काही नियम आहेत. वाहनाची गती कमी करणे एवढाच उद्देश गतिरोधकाचा आहे. त्यामुळे गतीरोधक तयार करताना तो व्यवस्थित असणे आवश्यक आहे. मात्र वैरागडात तयार करण्यात आलेला गतिरोधक अतशिय दोषपूर्ण आहे. दोन्ही बाजुला उतार दिला नाही. एखाद्या तलावाच्या पाळीप्रमाणे रस्त्यावर उंचवटा तयार करून ठेवला आहे. गतिरोधकावरून वाहन नेताना वाहनाची चाके एकदम गतिरोधकाला जाऊन धडकतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. विशेष करून रात्रीच्या सुमारास गतिरोधक दिसून येत नाही. त्यामुळे या गतिरोधकाला वाहने धडकत आहेत. परिणामी गतिरोधकामुळे अपघात कमी होण्याऐवजी वाढले आहेत.एका बाजुला जिल्हा परिषद कन्या शाळेचे प्रवेशद्वार तर दुसऱ्या बाजुला महाराष्टÑ विद्यालयाचे प्रवेशद्वार आहे. ब्रेकर चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आला असल्याने वाहनधारक रस्ताच्या बाजुने वाहने टाकतात. बाजुला जिल्हा परिषद शाळेचे प्रवेशद्वार आहे. एखादा विद्यार्थी शाळेतून रस्त्यावर येतेवेळी त्याला वाहन धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही बाजुला शाळा असल्याने या ठिकाणी गतिरोधक बांधणे आवश्यक होते. मात्र गतिरोधक बांधण्याचे नियम पाळण्यात आले नाही.अभियंत्याचे दुर्लक्षकंत्राटदाराकडून काम व्यवस्थित करून घेणे हे अभियंत्याचे काम आहे. मात्र कंत्राटदाराने चुकीच्या पध्दतीने गतिरोधकाचे काम केले. एखाद्या सामान्य व्यक्तीने गतिरोधकावर एक नजर टाकली तरी गतिरोधकाचे बांधकाम कसे दोषपूर्ण आहे, हे लक्षात येते. असे असतानाही अभियंत्याच्या कसे काय लक्षात आले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कंत्राटदारांकडून टक्केवारी घेण्याची सवय झालेल्या अभियंत्याने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक