शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्यानेही त्यागले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

मागील १५ दिवसांपासून प्रकृती आणखी खालावल्याने शिलाला नागपूर येथील मेडीकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले होते. त्याच ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मुलीच्या निधनाची बातमी ऐकताच तिचे पिता देवाजी वैरागडे हे अतिवदु:खात बुडाले. तिच्या मृत्यूची बातमी त्यांना असह्य करून सोडली.

ठळक मुद्देभेंडाळा येथील घटना : हृदयविकाराचा आला झटका

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : आपल्या लाडक्या मुलीचा आजाराने मृत्यू झाल्याचे दु:ख अनावर झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन मुलीच्या मृत्यूच्या काही तासानंतर पित्याचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे घडली.देवाजी पत्रू वैरागडे (५५) रा. भेंडाळा व शिला शत्रुधन लटारे (२०) रा. मेंढा (बोदली) ता.गडचिरोली असे मृत पिता व मुलीचे नाव आहे. शिलाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. तिला मेंढा येथे देण्यात आले होते. तिला दोन महिन्याचे बाळही आहे. काही दिवसापूर्वीपासून ती कावीळ आजाराने ग्रस्त होती. तिच्या कुटुंबियांनी उपचार केले. मात्र प्रकृती बिघडतच चालली होती. मागील १५ दिवसांपासून प्रकृती आणखी खालावल्याने शिलाला नागपूर येथील मेडीकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले होते. त्याच ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.मुलीच्या निधनाची बातमी ऐकताच तिचे पिता देवाजी वैरागडे हे अतिवदु:खात बुडाले. तिच्या मृत्यूची बातमी त्यांना असह्य करून सोडली. तसेच शिलाच्या दोन महिन्याच्या बाळाचे काय होणार, याचीही चिंता वैरागडे यांना लागली होती. या दु:खात असतानाच सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्ूयू झाला. मुली पाठोपाठ पित्याचाही मृत्यू झाल्याने वैरागड परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वैरागडे यांच्या पार्थिवावर मार्र्कंडादेव येथील वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंड असा आप्त परिवार आहे. शिलाच्या पार्थिवावर तिचा मेंढा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.या हृदयद्रावक घटनेने भेंडाळा गावावर शोककळा पसरली होती. अत्यंत दु:खद वातावरणात वैरागडे यांना गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला.मुलीचे पार्थिवही बघितले नाहीमुलगी शिला लटारे हिचा रविवारच्या रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नागपुरात मृत्यू झाला. तिचे पार्थीव मूळ गाव असलेल्या मेंढा येथे आणले जाणार होते. मुलीचे अंतिमदर्शन घेण्याची वडिलांची इच्छा सुध्दा अपुरी राहिली. सोमवारी सकाळीच वैरागडे यांना हृदयविकाराचा झटका आला.