शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

वयाच्या चाळीशीत ३० मुलांचे पालकत्व स्वीकारणारा ‘बाप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:01 IST

विद्यादानासोबत आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या या दाम्पत्याच्या मोफत शिकवणी वर्गात एका उन्हाळ्याच्या सुटीत एक विद्यार्थी आपली अडचण घेऊन आला. मला तालुक्याच्या ठिकाणी राहून इथेच अभ्यास करायचा आहे असे त्याने विजय सरांना सांगितले. त्याची शिक्षणाबद्दलची आवड पाहून सरांनी अशा शिक्षणाची गोडी असणाऱ्या मुलांचे पालकत्व घेण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच त्यांनी ‘संस्कार’ ही संस्था स्थापन केली.

ठळक मुद्दे१२ वर्षांपासून देताहेत शिक्षणहोतकरू मुलांच्या जीवनाला दिशा

रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, हलाकीची परिस्थिती आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक होतकरू मुले शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे क्षमता असूनही त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळत नाही. अशाच होतकरू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांच्या राहण्याचीही सोय करणारा बाप माणूस या तालुक्यात आहे याची कल्पना अनेकांना नाही. प्रसिद्धीपासून दूर राहून गेल्या १२ वर्षांपासून त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे.विजय सोमय्या सुंकेपाकवार असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना तेवढ्याच समर्थपणे साथ देत एक प्रकारे मातृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विजय यांच्या पत्नी पुजा यांचीही यात मोलाची भूमिका आहे.विद्यादानासोबत आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या या दाम्पत्याच्या मोफत शिकवणी वर्गात एका उन्हाळ्याच्या सुटीत एक विद्यार्थी आपली अडचण घेऊन आला. मला तालुक्याच्या ठिकाणी राहून इथेच अभ्यास करायचा आहे असे त्याने विजय सरांना सांगितले. त्याची शिक्षणाबद्दलची आवड पाहून सरांनी अशा शिक्षणाची गोडी असणाऱ्या मुलांचे पालकत्व घेण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच त्यांनी ‘संस्कार’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून तुटपुंज्या व्यवस्थेतही उन्हाळी निवासी केंद्र सुरू केले. आर्थिक अडचण निर्माण होऊ लागली. काहींनी मदतीची हात पुढे केले. त्यातून पुढे मुलांना मोफत शिकवणी वर्गासोबत राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था होऊ लागली. शेगावच्या श्री संत गजानन महाराज सेवा संस्थानने त्यांना ५ संगणक भेट दिले. त्यातून गरीब व होतकरू मुले मोफत संगणकही शिकत आहेत. ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पनाही राबविली जाते. लॉकडाऊनच्या काळात अडचण असली तरी आतापर्यंत ३० मुलांचे पालकत्व निभावले आहे.स्वत:पुरते जीवन हे खरे जीवन नाही. आपल्यामुळे कुणी सुखी झाला का? कुणाला आपण उपयोगी पडलो काय? आपल्या जीवनाची ज्योत संपण्याआधी आपण किती दिवे प्रज्वलित करू शकलो याचे समाधआन आपल्याजवळ असले पाहीजे. त्यामुळेच हा उपक्रम निस्वार्थ भावनाने आणि स्वयंस्फूर्तीने सुरू केला. -विजय सुंकेपाकवारहा सेवायज्ञ करताना मला आपला-परका असा भेद अजूनही जाणवला नाही. याचे कारण आम्ही शिकवलेली मुले अजूनही समाजाप्रती सेवाभाव ठेऊन आमचा वारसा पुढे चालविण्यास प्रवृत्त होत आहेत. हे आम्ही या संस्थेच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या कार्याचे सार्थकच समजावे लागेल. या कार्याला माझे सदैव पाठबळ राहील.- पुजा सुंकेपाकवाररक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम !

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिन