शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! देसाईगंजमध्ये जन्मदात्याची, सिरोंचात अर्धांगिनीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 15:39 IST

कुटुंबातील सदस्यांच्या जीवावर उठण्याच्या घटनांनी हादरला जिल्हा

गडचिरोली : वडील आणि मुलात असलेले रक्ताचे नाते असो, की पती आणि पत्नीत असलेले जीवाभावाचे नाते असो, त्यात एकमेकांवर जीव ओवाळून टाकला जातो. पण इथे जिल्ह्याच्या दोन टोकांवर झालेल्या दोन घटनांमध्ये मुलाने जन्मदात्या पित्याची आणि पतीने पत्नीची हत्या करून मोठा धक्का दिला आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटना हादरवून सोडणाऱ्या ठरल्या आहेत.

कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी वडिलांना संपविले

देसाईगंज शहरातील तुकूम वार्ड परिसरात ५ डिसेंबर रोजी एका ५३ वर्षीय इसमाचा खून करून वडसा-गोंदिया रेल्वे लाइनलगत एका शेताच्या बांधावर मृतदेह ठेवण्यात आला होता. सुरुवातीला त्या इसमाचा मृत्यू रेल्वे अपघात झाला की त्याचा खून झाला याबाबत संभ्रमाची स्थिती होती. परंतु एक तरुण रक्ताने माखलेल्या कपड्यात काही नागरिकांच्या निदर्शनास आला असल्याच्या खात्रीशीर माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. तो दुसरा-तिसरा कोणी नसून मृत व्यक्तीचा मुलगाच असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.

मृतक अरुण संपत कोवे (५३ वर्षे) हे आपल्या कुटुंबासह शहरातील शिवाजी वार्ड येथे राहत होते. त्यांचा मुलगा करण (२८) हा विवाहित असून, तो अनेक दिवसांपासून पत्नीला घेऊन वेगळा राहण्याची इच्छा वडिलांजवळ व्यक्त करत होता. परंतु वडिलाने त्याची इच्छा नाकारली होती. त्याच रागातून त्याने वडिलांना कायमचे संपविले.

पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून मुलाला अटक केल्यानंतर चौकशी केली असता मुलगाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून मंगळवारी देसाईगंज न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

हत्या करून रेल्वे अपघाताचा केला बनाव

सोमवारी अरुण कोवे रोजच्याप्रमाणे शेळ्या चारण्याकरिता गेले असताना दुपारी १:३० ते २ वाजताच्या सुमारास मुलगा करण याने धारदार शस्राने वडिलाची हत्या केली. ही हत्या नसून अपघात आहे, असा बनाव करण्यासाठी मृतदेह वडसा रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे पटरीजवळच्या बाभळीच्या झाडाखाली धुऱ्यावर फेकून दिला. परंतु त्याच्या अंगावरील रक्ताचे डाग काही लोकांच्या निदर्शनास आल्याने ही बाब प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली.

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा गळा आवळला

पत्नीचे मामाच्या मुलासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी येथील वाॅर्ड क्रमांक ७ मध्ये घडली. श्रवंती गणेश मिट्टापल्ली (३० वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पती गणेश भिक्षापती मिट्टापल्ली याला अटक केली.

मूळचा तेलंगणातील असलेला गणेश गेल्या आठ वर्षांपासून सिरोंचा येथे राहतो. तो गावोगावी भांडी, कपडे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला एक मुलगाही आहे; पण पत्नीचे तिच्या तेलंगणातील मामाच्या मुलासोबत अनैतिक संबंध असल्याचा गणेशला संशय होता. त्यातूनच सोमवारी सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजेदरम्यान त्याने दर्ग्याजवळील आपल्या भाड्याच्या घरात पत्नी श्रवंती हिचा गळा दाबून तिला जिवे मारले. ही बाब उघडकीस आल्यानंतर गणेश याच्याविरुद्ध रात्री ११ वाजता कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ९ तारखेपर्यंत पीसीआर दिला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास शिंदे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली