शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या नामकरणाआधीच निघाली पित्याची अंत्ययात्रा; ट्रकने जागीच चिरडले

By दिलीप दहेलकर | Updated: February 29, 2024 21:27 IST

आनंदावर पडले विरजण

दिलीप दहेलकर, गडचिराेली : घरात चिमुकल्या बाळाचे आगमण झाले की, कुटूंबियांच्या आनंदाला पारावार उरत नाही. दरम्यान सर्वाना चाहुल लागते, ती म्हणजे चिमुकल्याच्या नामकरण साेहळयाची. ताे दिवस कधी येताे, याची कुटूंबियांसह सर्वांनाच माेठी उत्कंठा लागलेली असते. नामकरणाची तारीख ठरली. पत्रिकाऐवजी प्रत्यक्ष भेटून नामकरण कार्यक्रमाचे नातेवाईकांना आमंत्रण देणे सुरू झाले. दरम्यान एक दिवसांवर आलेल्या नामकरण कार्यक्रमाचे नातेवाईकांना निमंत्रण देवून दुचाकीने स्वताच्या गावाला परतताना काळाने पित्यावर झडप घातली. अन् कार्यक्रम हाेण्यापुर्वीच ‘त्या’ चिमुकलीला पित्याच्या प्रेमाला पाेरके व्हावे लागले. ही हृदयद्रावक घटना घडली, २९ मार्च राेजी सायंकाळी ४ वाजताच्या सूमारास धानाेरा तालुक्यातील येरकड टी पाईंटवर.

देवनाथ मोतीराम काटेंगे (३२) रा. अर्जुनी तालुका धानोरा असे अपघातात ठार झालेल्या पित्याचे नाव आहे.

देवनाथ काटेंगे यांना तीन अपत्य आहेत. पहिला मुलगा, दुसरी मुलगी आणि सर्वात लहान दीड महिन्याची चिमुकली मुलगी. सदर लहान मुलीचा १ मार्च रोजी नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान वडील देवनाथ काटेंगे हे गावापासून जवळच असलेल्या आपल्या मामाच्या गावी सिंदेसुर येथे दुचाकीने नामकरण कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेले. एम. एच. ४९ एल - ६९५८ या क्रमांकाच्या दुचाकीने नातेवाईकाचे गाव गाठले. दरम्यान नातेवाईकांनी जेवण करून जाण्याचा आग्रह केला परंतु उद्या मुलीचे नामकरण असल्याने सामानाची जुळवाजुळव आणि तयारी करायची आहे, त्यामुळे मला लवकर जाणे आवश्यक आहे, असे सांगून देवनाथ गावी परत जाण्यासाठी निघाला. नियतीने त्याच्या नशिबात काय लिहुल ठेवले याची मुळीच त्याला कल्पना नव्हती.

धानाेरा - मुरूमगाव मार्गावरून येताना येरकड टी पॉईंट जवळ मुरूमगावकडून छत्तीसगड येथून गडचिराेलीकडे निलगिरीच्या लाकडाची वाहतुक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक बसली. धडकेने दुचाकी स्वार काेसळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. आनंदाचे क्षण क्षणात दुखात बदलून गेले. 

पित्याचा मृतदेह पाहून त्याची लहान मुले, पत्नीने एकच हंबरडा फोडला. घरचा कर्ता पुरुष काळाच्या पडदयाआड गेल्याने पत्नीच्या अंगावर कुटूंबाची जबाबदारी येवून पडली. धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. 

गावकऱ्यांमध्येही हळहळ

उद्या मुलीच्या नामकरणाकरिता येणाऱ्या नातेवाईकांना अंत्यविधीला यावे लागणार आहे. निमंत्रण पाेहाेचले नामकरण साेहळयाचे मात्र अपघाती निधनाने काटेंगे यांच्या घरी अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवली. गावकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त हाेत आहे.

टॅग्स :Accidentअपघात