शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 21:54 IST

तालुक्यातील बोरी येथील वैनगंगा नदीघाट परिसरात उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील मोटार बंद पडून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी सदर योजना बंद पडल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती.

ठळक मुद्देखासदारांनी घेतली दखल : बोरी उपसा सिंचन योजनेच्या मोटारची दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील बोरी येथील वैनगंगा नदीघाट परिसरात उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील मोटार बंद पडून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी सदर योजना बंद पडल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. खा.अशोक नेते यांनी ही समस्या जाणून घेऊन संबंधित सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या निर्देशानुसार उपसा सिंचन योजनेची मोटार दुरूस्त करण्यात आली. आता शेतजमिनीला पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बोरी येथील गेल्या १५ वर्षांपासून उपसा सिंचन योजना बंद पडली होती. आता खा.अशोक नेते यांच्या प्रयत्नाने मोटारची दुरूस्ती होऊन योजना सुरू झाली आहे. आता २२ आॅक्टोबर सोमवारपासून बोरी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. खा.अशोक नेते यांनी अहेरी तालुक्याच्या बोरी भागात दौरा केला. दरम्यान आयोजित जनसंपर्क बैठकीत बोरी येथील अनेक शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजना बंद असल्याने धानपीक वाचविण्याचा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला आहे. निसर्गाने पाठ फिरविली असून धानपिकाला अखेरचे एक पाणी आवश्यक आहे. सध्या बोरी भागातील धानपीक शेवटच्या टप्प्यात असून लोंब फुटत आहेत. अशावेळी धानपिकाला पाणी न मिळाल्यास दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे, अशी समस्या खासदारांपुढे मांडली.दरम्यान खा.नेते यांनी लागलीच लघुसिंचन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता नरेश बावनगडे यांच्याशी संपर्क साधला. सदर योजनेच्या बंदची कारणे जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेसाठी उपसा सिंचन योजनेची मोटार व इतर बाबींची दुरूस्ती करून शेतकऱ्यांच्या धानपिकाला तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले. त्यानंतर अधीक्षक अभियंत्यांच्या प्रयत्नाने मोटारची दुरूस्ती करून ही योजना सुरळीत करण्यात आली. आता सोमवारपासून सदर उपसा सिंचन योजनेचे पाणी बोरी भागातील धानपिकाला मिळणार आहे. बैठकीला भाजपचे प्रदेश सदस्य बाबुराव कोहळे, रवींद्र ओल्लालवार, कार्यकारी अभियंता शेंडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी हजर होते.अहेरी उपविभागाला न्याय देण्यास कटिबद्ध-नेतेअहेरी उपविभागात आजही शिक्षण, आरोग्य, सिंचन, रोजगार व इतर क्षेत्रातील अनेक समस्या कायम आहेत. या समस्या मार्गी लावण्यासाठी आपला केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. अहेरी उपविभागाचा विकास करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहो, अशी ग्वाही खा.अशोक नेते यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते