शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादन घटल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

यावर्षी चांगले उत्पादन हाेणार, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. मात्र धान पिकावर विविध प्रकारच्या राेगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे चांगली शेतजमीन व पाण्याची सुविधा आहे, अशा शेतजमिनीत एकरी १८ ते २० पाेते धानाचे उत्पादन हाेते. मात्र यावर्षी एकरी १३ ते १४ पाेते धानाचे उत्पादन हाती येत आहे. काही शेतकऱ्यांना तर यापेक्षाही कमी उत्पादन हाेत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देयंदा उतारा घटला : एकरी पाच ते सहा पाेते झाले कमी

  लाकेमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध अडचणींना ताेंड द्यावे लागले. शिवाय पावसाचा अनियमितपणा व इतर कारणामुळे यावर्षी धान उत्पादनाचा उतारा घटला आहे. एकरामागे पाच ते सहा पाेते धानाचे उत्पादन कमी झाल्याचे मळणी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यावर्षी धानाचे उत्पादन घटल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगामात यावर्षी धान पिकावर माेठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा, खाेडकीडा आदी राेग व कीडीने आक्रमन केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या ताेंडचा घास हिरावला. कीड राेगामुळेधानाचे प्रती हेक्टरी उत्पादनात बरीच घट झाली आहे. परिणामी काही शेतकऱ्यांचा लागवड खर्चसुद्धा भरून निघणे कठिण झाले आहे. आता वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे. यावर्षी चांगले उत्पादन हाेणार, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. मात्र धान पिकावर विविध प्रकारच्या राेगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे चांगली शेतजमीन व पाण्याची सुविधा आहे, अशा शेतजमिनीत एकरी १८ ते २० पाेते धानाचे उत्पादन हाेते. मात्र यावर्षी एकरी १३ ते १४ पाेते धानाचे उत्पादन हाती येत आहे. काही शेतकऱ्यांना तर यापेक्षाही कमी उत्पादन हाेत असल्याचे दिसून येते. मजुरांच्या मजुरीमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. तर हाती येणारे उत्पादन त्यापेक्षा कमी हाेत आहे. जिल्ह्याच्या बऱ्याच भागात धान उत्पादनात यंदा घट आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी सेवा सहकारी साेसायटी व शासकीय तसेच खासगी बॅंकांकडून कर्ज काढले. आता उत्पादन कमी प्रमाणात झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शासनाने यावर समाधानकारक ताेडगा काढावा. शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

अनेकजण पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेतगडचिराेली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज करून पीक विमा याेजनेत सहभाग घेतला. विविध प्रकारचे कीड, राेग व निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पादनावर परिणाम झाला. मात्र संबंधित विमा कंपनीकडून पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळत नसेल तर पीक विमा काढायचाच कशाला, असा सवाल शेतकरी करीत आहेत. 

उत्पादन कमी हाेण्याची कारणेयावर्षीच्या खरीप हंगामात पाऊस उशिरा बरसला. धानाचे वाफे टाकहूनही पाऊस न आल्याने राेवणीचा हंगाम लांबणीवर गेला. राेवणीचे काम उशिरा झाल्याने धान भरण्यास विलंब झाला. परिणामी कापणी, बांधणी व मळणीचा हंगाम लांबणीवर पडला. पावसाचा अनियमितपणा, उशिरा झालेली राेवणी, विविध राेगांचा प्रादुर्भाव तसेच धान भरून झाल्यावर कापणीच्यावेळेस अवकाळी पाऊस बरसला. या सर्व कारणांमुळे यंदा जड, हलके व मध्यम प्रतीच्या धानाचे उत्पादन घटले आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती