शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्याचे काम अयोग्य

By admin | Updated: April 17, 2017 01:40 IST

वैरागड ग्राम पंचायतीअंतर्गत येणाऱ्या पाठणवाडा येथील शेतकरी केशव कुमरे व नरसू कुमरे यांच्या शेतात शेततळा खोदण्याचे काम सुरू झाले आहे.

पाठणवाडातील प्रकार : जेसीबीच्या साहाय्याने खोदकामाची माती टाकली अस्ताव्यस्त वैरागड : वैरागड ग्राम पंचायतीअंतर्गत येणाऱ्या पाठणवाडा येथील शेतकरी केशव कुमरे व नरसू कुमरे यांच्या शेतात शेततळा खोदण्याचे काम सुरू झाले आहे. सदर काम योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. भूजल पातळीत वाढ व्हावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान हातात घेतले आहे. याअंतर्गत पाठणवाडा येथील केशव कुमरे व नरसू कुमरे या दोन शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करण्यात आले आहे. दोन्ही शेततळ्याचे काम यंत्राच्या सहाय्याने केले जात आहे. शेततळ्यात जास्तीत जास्त पाणी साचून राहण्यासाठी शेततळ्याची पाळ उंच असणे आवश्यक आहे. त्यासाठी शेततळ्यामधून निघलेली माती व्यवस्थित पाळीप्रमाणे पसरविणे आवश्यक आहे. शेततळ्यांचे खोदकाम जेसीबीच्या सहाय्याने केले जात आहे. खोदकामादरम्यान निघालेली माती व्यवस्थित न टाकता अस्ताव्यस्त फेकून देण्यात आली आहे. त्यामुळे शेततळ्यात पाणी साचून राहण्यास अडचण निर्माण होणार आहे. सदर माती व्यवस्थित करतो म्हटल्यास शेतकऱ्याला हजारो रूपयांचा खर्च येणार आहे. गरीब शेतकऱ्यांना एवढा खर्च झेपणे अशक्य आहे. खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराला कृषी सेवकाचे अभय असल्याचे दिसून येत आहे. शेततळ्यासाठी किती रक्कम मंजूर झाली आहे, याची माहिती कृषी सेवक शेतकऱ्यांना देण्यास तयार नाही. यावरून कंत्रादार व कृषी सेवक यांची मिलीभगत असल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर) दोन्ही शेततळ्याचे काम जेसीबीसीच्या सहाय्याने करण्यात आले. खोदकाम रात्रीच्या वेळी झाल्याने शेततळ्याची पार समांतर झाली नाही. मात्र शेतकऱ्यांना सदर काम पुन्हा योग्य पध्दतीने करून दिल्या जाईल. सदर शेततळा कामासाठी मंजूर झालेल्या ५० हजार रूपयांचा निधी यंत्राने काम करणाऱ्या लोकांना वितरित करण्यात आला. - डी. टी. आंबीलडुने, कृषी सहायक, वैरागड