शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

धान काट्यासाठी शेतकरी वेटींगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील गावांमध्ये आविका संस्थांच्या वतीने एकूण ५३ केंद्र सुरू करण्यात आले आहे. अहेरी उपविभागात पाच तालुक्यांसाठी महामंडळाचे ३६ केंद्र आहेत. याशिवाय मार्केटिंग फेडरेशनचे २० वर केंद्र आहेत. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी करणारे अनेक खासगी व्यापारी आहेत.

ठळक मुद्देमहामंडळाची खरीप हंगामातील खरेदी : प्राप्त सातबारानुसार बनविली जाते यादी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असून केंद्रावर प्राप्त सातबारा व आणलेल्या धानानुसार शेतकऱ्यांची यादी बनविली जात आहे. तोपर्यंत केंद्र परिसरात धान देखभालीत ठेवले जात आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तुलनेत महामंडळ व फेडरेशनचे केंद्र कमी असल्याने अनेक शेतकरी काटा होण्यासाठी वेटींगवरच असल्याचे दिसून येत आहे.आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील गावांमध्ये आविका संस्थांच्या वतीने एकूण ५३ केंद्र सुरू करण्यात आले आहे. अहेरी उपविभागात पाच तालुक्यांसाठी महामंडळाचे ३६ केंद्र आहेत. याशिवाय मार्केटिंग फेडरेशनचे २० वर केंद्र आहेत. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी करणारे अनेक खासगी व्यापारी आहेत. महामंडळ धानाला जेवढा भाव देत आहे त्या जवळपासचा भाव खासगी व्यापारीही शेतकऱ्यांना देत आहेत. मात्र यावर्षी शेतकºयांचा कला खासगी व्यापाऱ्यांकडे फार कमी असून महामंडळ अर्थात आविका संस्था तथा फेडरेशनच्या केंद्राकडे आहे. काही शेतकरी खरेदी-विक्री सहकारी संघाच्या केंद्रांवरही धान विक्रीसाठी नेत आहेत.महामंडळाच्या केंद्रांवर धानाची विक्री करणाºया शेतकऱ्यांना प्रतीक्विंटल ५०० रुपये प्रमाणे बोनस दिला जातो. बोनसची ही मर्यादा ५० हजार क्विंटलपर्यंत सरकारने ठेवली आहे. याशिवाय महाविकास आघाडीच्या सरकारने काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना क्विंटल मागे २०० रुपये देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धानाच्या भावासोबत क्विंटलमागे ७०० रुपये मिळणार आहेत. ‘अ’ प्रतीच्या धानाला १ हजार ८३० रुपये व ‘ब’ प्रतीच्या धानाला १ हजार ११५ रुपये भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस पकडून एका क्विंटल मागे २ हजार ५०० रुपये प्राप्त होणार आहे. खासगी व्यापारी १ हजार ८०० रुपये भाव देत असले तरी त्यांच्याकडून बोनसची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या धानाला कमी भाव पडतो. त्यामुळे यावर्षी अनेक धान उत्पादक शेतकरी महामंडळ व फेडरेशनच्या केंद्राकडे धानविक्रीसाठी वळले आहेत.आविका संस्थेच्या केंद्रावर शेतकऱ्यांना सातबारा, आधारकार्ड, नमूना आठ व बँक खाते आदी दस्तावेज द्यावे लागत आहे. धान नेल्यावर शेतकरी हे सर्व दस्तावेज केंद्राच्या व्यवस्थापकाकडे सादर करीत आहेत. मात्र एकाचवेळेस सर्व शेतकºयांच्या धानाचा काटा केला जात नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. केंद्राच्या वतीने प्राप्त सातबारा व इतर दस्तावेजनुसार धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या धानाचा काटा केला जात आहे. शेतकऱ्यांना सात ते आठ दिवस तर काहींना अधिक दिवस धानाचा काटा होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.आधारभूत धान खरेदी केंद्र वाढवा- रमेश भुरसेबोनस व शासनाकडून मिळणाऱ्या रकमेमुळे महामंडळ व फेडरेशनच्या केंद्रांवर धानाची आवक वाढली आहे. धानाचा काटा होण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण जात आहे. त्यामुळे महामंडळाने आधारभूत धान खरेदी केंद्राची संख्या वाढवावी, जिल्हाधिकाऱ्यांनीही गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त केंद्र मंजूर करावे, अशी मागणी भाजपच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रमेश भुरसे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड