शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:14 IST

भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताच्या वतीने सोमवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी उपविभागातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देभारतीय किसान संघाचे नेतृत्त्व : वनहक्क पट्ट्यांचे दावे तात्काळ मंजूर करा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताच्या वतीने सोमवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी उपविभागातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.वनजमिनीचे पट्टे मिळण्यासाठी हजारो नागरिकांनी प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले आहेत. या प्रस्तावामध्ये थोड्याफार त्रुट्या आहेत. मात्र या त्रुट्या लक्षात आणून देऊन त्या दूर करण्यासाठी सूचना दिल्या जात नाही. परिणामी हजारो प्रस्ताव तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात पडून आहेत. त्रुट्या दूर करून वनपट्ट्यांचे वाटप करावे, शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीज पुरवठा करावा, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची किंमत संबंधितांना देण्यात यावी, गडचिरोली जिल्ह्यातील तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना लाभ देण्यात यावा, शेताच्या कुंपनासाठी मोफत तार उपलब्ध करून द्यावा, रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शेतीतून उत्पादन घेणे अशक्य झाले आहे. रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले जाते. त्यामुळे रानडुकरांना मारण्याची परवानगी द्यावी. सर्व शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट किंमत द्यावी, कृषीसाठी स्वतंत्र बजट सादर करावे, स्वतंत्र कृषी न्यायालय स्थापन करावे, शेतीवर आधारित लघु उद्योग तालुकापातळीवर सुरू करावे, गोवंश हत्यावर पूर्णपणे बंदी लावावी, शेतकरी गायी पाळतील, यादृष्टीने नियोजन करावे, आणेवारी पद्धतीचा फेर विचार करावा, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.भारतीय किसान संघाच्या या मोर्चात अहेरी उपविभागातील अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड या तालुक्यातील जवळपास ५०० नागरिक सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गाने मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत महामंत्री बाबुराव देशमुख, विदर्भ प्रांत संघटन मंत्री रमेश मंडाळे, अहेरी तालुकाध्यक्ष संजय यमसलवार, तालुकामंत्री सुधाकर मुलकरी, उपाध्यक्ष लालसू पुंगाटी, रवी कुळमेथे, मुलचेरा तालुका मंत्री हनमंतू वेलादी, मिलन बिश्वास, संतोष जोशी यांनी केले.शासनाच्या दृष्टीने येथील जनतेच्या विकासाच्या दृष्टीने या मागण्यांकडे शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चा