शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:26 IST

स्वत:चे उत्पन्न दुप्पट करण्याकरिता शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अशोक चौैधरी यांनी केले.

ठळक मुद्देअपर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : गणेशपूर येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वत:चे उत्पन्न दुप्पट करण्याकरिता शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अशोक चौैधरी यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, कृषी विभाग, आत्मा आणि पशुसंवर्धन विभाग अंतर्गत २ आॅक्टोबर ते २५ डिसेंबर या कालावधीत २५ गावांमध्ये कृषी कलयाण अभियान-२ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जाणीव जागृती करण्यासाठी आरमोरी तालुक्यातील गणेशपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अशोक चौधरी मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे, तहसीलदार यशवंत धाईत, विषय विशेषज्ज्ञ पुष्पक बोथीकर, सुमित धावरे, डॉ.आर.एस.वाघमारे, तालुका कृषी अधिकारी एस.पी.ढोणे, डॉ.व्ही.व्ही.उदे, व्ही.डी.रहांगळे आदी उपस्थित होते.पुढे मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांनी शेतीला जोड म्हणून पुरक व्यवसाय कुकुटपालन, फलोत्पादन, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करावी, गाव पातळीवर शेती उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले.संदीप कऱ्हाळे यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, कम्पोस्ट यांचा वापर करण्याचे आवाहन केले. उत्पनात वाढ घडवून आणण्याकरिता तेलवर्गीय पिकांचे उत्पादन करावे, असे सांगितले. शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळ पिकांकडे वळावे, असेही आवाहन केले. अनंत पोटे यांनी शेतीचे उत्पादन वाढविण्याकरिता शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ.प्रकाश पवार यांनी शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण करून घ्यावे, आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्यावी, उत्पादनात वाढ आणि अधिक मोबदला मिळण्याकरिता सेंद्रिय शेतीचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. पुष्पक बोथीकर यांनी विविध पिकांवर येणारे कीड व रोगांचे व्यवस्थापन, कीटकनाशकांची हाताळणी याविषयी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांनी कृषी विभागामार्फत प्राधिनिधीक स्वरूपात कृषी निविष्ठांचे वाटप करावे, असे आवाहन केले.प्रशिक्षणादरम्यान प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना कृषीनिविष्ठांचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी