उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी धानोरा तालुक्यातील येरकड, कनाराटोला येथील उन्हाळी धान व प्रकाश कोराम यांच्या भाजीपाला लागवड व शेततळ्यातील मच्छीपालन प्लांटची पाहणी केली. शेततळ्यात राेहू ग्रहा, स्कप, गावठी वागुर इत्यादी प्रकारचे मासे साेडले आहेत. काेराम यांनी शेतात शेवगा, बांबू या झाडांची लागवड केली आहे. तसेच भाजीपाल्याचेही पीक घेतात. सर्व शेती सेंद्रिय पद्धतीने करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या प्रयाेगशील शेतीचे काैतुक केले. साेबत असलेल्या इतर शेतकऱ्यांशी चर्चा करून आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. यावेळी धानोराचे तहसीलदार सी. जी. पित्तुलवार, मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंबर, पुरवठा निरीक्षक चंदू प्रधान, तलाठी टेंभर्णे, कृषी पर्यवेक्षक ठाकरे आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स
बांधावर उपलब्ध हाेणार औषधी राेपटी
गडचिराेली येथील पाेटेगाव मार्गावर असलेल्या वनविभागाच्या नर्सरीत औषधी राेपटी वनविभागामार्फत तयार केली जाणार आहेत. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत वनविभागाला निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुढे ही राेपटी आदिवासी शेतकऱ्यांना वितरित केली जातील. त्यांची लागवड, देखभाल याविषयी शेतकऱ्यांना वनविभागामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. विक्रीची व्यवस्था आदिवासी विकास विभागामार्फत केली जाईल. या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न उपलब्ध हाेण्यास मदत हाेईल. तसेच पाेटेगाव मार्गावरील नर्सरी परिसरात काही वनऔषधी झाडांची लागवड केली जाईल. ही झाडे शेतकऱ्यांना पथदर्शी ठरतील, अशी माहिती एसडीओ आशिष येरेकर यांनी दिली.