शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

11 केव्हीची विद्युतवाहिनी शेतातून टाकण्यास शेतकऱ्यांचा विराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:00 IST

ही विद्युत वाहिनी कृषीपंपासाठी वेगळी केली जात असून कृषीपंपासाठी फक्त आठ तास वीज मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांची उन्हाळी फसल होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उपविभागीय अभियंता सार्वे, कनिष्ठ अभियंता बागडे यांनी बोडधा येथे जाऊन शेतकऱ्यांची समजूत घातली. दरम्यान,  शेतकऱ्यांनी त्यांना वीज पोल टाकू देण्यास नकार दर्शवला. त्यानंतर अधिकारीसुद्धा हताश होऊन तिथून परतले.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव/चोप : देसाईगंज तालुक्यात बोडधा येथील शेतकऱ्यांनी नवीन ११ केव्हीची विद्युत वाहिनी शेतातून टाकण्यास शनिवारला आलेल्या ठेकेदाराला विरोध दर्शविला. लोडशेडिंग विषयावरून शेतकरी यावेळी आक्रमक झाले हाेते. ही विद्युत वाहिनी कृषीपंपासाठी वेगळी केली जात असून कृषीपंपासाठी फक्त आठ तास वीज मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांची उन्हाळी फसल होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उपविभागीय अभियंता सार्वे, कनिष्ठ अभियंता बागडे यांनी बोडधा येथे जाऊन शेतकऱ्यांची समजूत घातली. दरम्यान,  शेतकऱ्यांनी त्यांना वीज पोल टाकू देण्यास नकार दर्शवला. त्यानंतर अधिकारीसुद्धा हताश होऊन तिथून परतले. लोडशेडिंग होणार नाही याची हमी आम्हाला द्या तरच नवीन वाहिनी टाका, अशी मागणी शेतकऱ्यांनी वीज विभागाकडे केली. यापूर्वी आम्हाला या वाहिनीसंदर्भात काही कळविले नाही आणि एकाएकी वीजवाहिनी वेगळी करून नवीन वाहिनी टाकल्याने शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शविल्याची माहिती आहे.

कृषिपंपाच्या वीज जोडण्या अजूनही अपूर्णच

-    गडचिरोली जिल्ह्यात कृषिपंपाच्या बऱ्याच वीज जोडण्या अजूनही अपूर्णच आहेत. पीक घेण्यासाठी शिल्लक वीज जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात, तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांकडून आकारण्यात येत असलेले अवाजवी वीज शुल्क कमी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागासह शासनाकडे केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. वन कायद्यामुळे जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प होऊ शकले नाहीत. सिंचनाचे मोठे प्रकल्प नसल्याने तलाव, विहिरी, नाले व बोडी यावर कृषिपंपाने सिंचनाची सोय केली जाते. शासनाच्या वतीने कृषिपंपाची वीज जोडणी करून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणी करून देण्यात आली असली तरी आजघडीला दीड हजारवर कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत. 

कृषीपंपांना कमी दाबाचा वीजपुरवठा हाेत असल्याने आम्हाला ही नवीन वाहिनी टाकावी लागत आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या पूर्वसंमतीची गरज नाही. - एन. एम. बागडे, कनिष्ठ अभियंता विद्युत विभाग, देसाईगंज.

 

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज