शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:36 IST

सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विहिरगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु येथील ८० टक्के शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही.

ठळक मुद्देनुकसानभरपाईची मागणी : मागील वर्षीपासून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विहिरगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु येथील ८० टक्के शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे नुकसानभरपाईचा लाभ देऊन तलाठ्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी विहिरगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी आरमोरी तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.आरमोरी तालुक्यातील विहिरगाव येथील शेतकऱ्यांची शेतजमीन नरोटी चक शेतशिवारात आहे. या भागातील शेतकरी निसर्गाच्या अवकृपेचा सामना करीत धानपिकाचे उत्पन्न घेतात. मागील वर्षीच्या हंगामात मावा, तुडतुडाच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. रोगांमुळे निम्मे पीक सुद्धा हाती पडले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनने तलाठी व कृषी सहाय्यकामार्फत रोगग्रस्त पिकांची मोका चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनामा करून सिर्सी साज्याच्या तत्कालीन तलाठ्यांनी नुकसानभरपाईसाठी शेतकºयांची यादी बनविली. मात्र, सदर यादी अद्यापही शासनाकडे पोहोचलेली नाही.परिणामी येथील शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत. नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी व तलाठ्याची चौकशी करावी, अन्यथा तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.सदर निवेदन शिवसेना माजी जिल्हाप्रमुख हरीश मने यांच्या नेतृत्त्वात तहसीलदार धाईत यांना दिले. निवेदन देतेवेळी माजी जि.प.सदस्य वेणू ढवगाये, उपसरपंच तामराव सहारे, हेमराज भोयर, दादाजी सपाटे, तामदेव सेलोटे, वासुदेव मडावी, गिरीधर गेडेकर, बाळाजी कोल्हे, तुकाराम कोवे, रवी सपाटे जीवन ठाकरे, इंदरशहा मडावी, रामदास गावडे, मनीराम कुमोटी, दादाजी भोयर, षदानंद कोसरे, विश्वनाथ चापले, कुसन कोवे, राजाराम सपाटे, अफजल बेग आदींसह विहिरगाव येथील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चा