आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोलीच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा कृषी महोत्सव व शेतकरी आणि महिला बचत गटांच्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कृषी महोत्सवात पीक लागवडीपासून विविध विषयांवर कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे. त्यामुळे या कृषी महोत्सवातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळणार आहे, असा विश्वास आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, डीआरडीएचे प्रकल्प संचालक सुनिल पाठारे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला.यावेळी आत्माच्या उपसंचालक प्रिती हिरळकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. स्थानिक चंद्रपूर मार्गावरील होणाºया या कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते तर मार्गदर्शक म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर उपस्थित राहणार आहेत.१७ ते १८ फेब्रुवारीदरम्यान फळ प्रक्रिया उद्योग निर्मिती, सेंद्रीय शेती व्यवस्थापन, धान शेतीतील कीटकांचे जैविक किडीमार्फत व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, पिकांची शास्त्रीय लागवड, तंत्रज्ञान व इतर विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. महिला बचत गटांचे ६६ व शेतकरी गटांचे १३४, असे एकूण २०० स्टॉल विविध उत्पादनाचे व कृषी यंत्राचे या ठिकाणी लागणार आहेत, असे डॉ. पवार यांनी सांगितले.
जिल्हा कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांना मिळणार नवी दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:37 IST
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोलीच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा कृषी महोत्सव व शेतकरी आणि महिला बचत गटांच्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांना मिळणार नवी दिशा
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचा विश्वास : बचत गटांचे २०० स्टॉल राहणार