शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील कारली दलालांच्या दावणीला; लॉकडाऊनचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 18:41 IST

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उत्पादित माल बाहेर जिल्ह्यात नेता येत नाही. त्यामुळे पडत्या भागात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतो. यात शेतकऱ्यांना वाजवी दर मिळत नाही. परिणामी माल सडवण्यापेक्षा विक्री करुन नुकसान सोसावे लागते.

ठळक मुद्देमोहटोला-किन्हाळा येथील शेतकऱ्यांचा माल पडत्या भावात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उत्पादित माल बाहेर जिल्ह्यात नेता येत नाही. त्यामुळे पडत्या भागात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतो. यात शेतकऱ्यांना वाजवी दर मिळत नाही. परिणामी माल सडवण्यापेक्षा विक्री करुन नुकसान सोसावे लागते. तालुक्याच्या मोहटोला-किन्हाळा परिसरात कारल्यांचे भरपूर प्रमाणात उत्पादन होत आहे. मात्र त्यांना बाहेर माल नेता येत नसल्याने दलालांमार्फत व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे येथील कारले दलालांच्या दावणीलाच बांधले असल्याचे दिसून येत आहे.मोहटोला-किन्हाळा गाव कारल्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अवघ्या चार-पाच वर्षात या भागात व्यापाऱ्यांनी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली. परिसरातील संपूर्ण कारले सदर बाजारपेठेत येत असल्याने व्यापारी हा माल दूरवरच्या भागात नेऊन विक्री करायचे; परंतु सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर जिल्ह्यात मालाची वाहतूक करता येत नाही. कारल्यांची विक्री जिल्ह्यांतर्गतच करावी लागत आहे. यासाठी माल खरेदीकरिता व्यापाºयांना गावाच्या वेशीवरच थांबावे लागत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार मोहटोला-किन्हाळा ग्रामपंचायतने ठराव घेऊन गावातील कारले बाजारावर लक्ष ठेवत बाजारपेठ बंद पाडली. येथील बाजारपेठ बंद पडल्याने कारले खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपला ठिय्या गावाच्या वेशीवर मांडला. ते कारल्यांची खरेदी करीत आहेत. त्यांनी कारल्यांची खरेदी सुरुच ठेवली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील वस्तंूच्या नावावर खरेदी केलेले कारले कुठे जातात, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.ग्रामपंचायतीने गावाच्या वेशीवर कर्मचारी नेमून गावात येणाºया वाहनाची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. येथे प्रवेश करणाऱ्यांचे वाहन क्रमांक, परवाना क्रमांक, चालकाचे नाव, सोबत येणारे खरेदीदार व दलालांचे नाव खरेदीदार दलालांचे नाव, माल विक्रीला नेण्याचे ठिकाण आदी माहितीची नोंद घेत आहेत. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुण्यासाठी पाणी व साबन वापरणे आवश्यक केले आहे. सध्या हे खरेदीदार वेशीवरच थांबून मालाची खरेदी करीत आहेत. मात्र याठिकाणी मास्कचा वापर व सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस