शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मृगातही ऊन्हाच्या झळा बळीराजाला करीत आहेत असह्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 10:28 IST

यावर्षी उष्णतामानाने कहर केला असून उन्हामुळे जीवाची लाही -लाही होत आहे. शेतीच्या खरीपपूर्व हंगामाला काही प्रमाणात सुरवात झाली आहे.

ठळक मुद्देमान्सूनच्या प्रतीक्षेत नागरिकही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: यावर्षी उष्णतामानाने कहर केला असून उन्हामुळे जीवाची लाही -लाही होत आहे. शेतीच्या खरीपपूर्व हंगामाला काही प्रमाणात सुरवात झाली आहे. जनावरांच्या सुक्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. वाढलेल्या तापमानाने मात्र शेतीची मशागत करतांना बळीराजाच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. रोहणी नक्षत्रात हुलकावणी देणारा पाऊस मृगातही उन्हाच्या झळांनी बळीराजाला असह्य करीत आहे. त्यामुळे बळीराजासह नागरिकही मान्सून पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.८ जून ला मृगनक्षत्रास सुरवात झाली. रोहिणी नक्षत्राच्या शेवट पावसाची काही ठिकाणी हलकी सर आली. परंतू ती वातावरणात गारवा निर्माण करण्यास अपयशी ठरली. मागील दोन तीन वर्षापासून मृगही हुलकावणी देत असल्याने वातावरणात उकाडा कायम आहे. उन्हाळ्यापेक्षाही जास्त ऊन मृगात लागत आहे. १७ जून नंतर मान्सून बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला असला तरी उन्हाच्या तीव्रतेने कासावीस झाला आहे.मृगनक्षत्रास प्रारंभ झाला असल्याने शेतकरी बि- बियाण्यांचा शोध घेत आहेत.बाजारात अनेक कंपन्यांचे बियाणे आले असले तरी मात्र असून शेतकऱ्यांकडून बियाने खरेदीला मात्र वेग आलेला नाही. योग्य बियाणे कंपनीचे व कोणत्या वाणांचे बियाणे घेणे फायदेशीर राहील याची शेतकऱ्यांमध्ये चाचपणी सुरु आहे. शेती नांगरी न झाल्याने वाफे तयार करण्यास प्रारंभ होण्यास आहे. तूर लागवडीसाठी धुरे सफाईला सुरूवात झाली असली तरी माती टाकण्यास मात्र पाऊसाची प्रतिक्षा आहे.कृषि विभागामार्फत शेतीपूर्व हंगामात कोणती कामे करावी, बियाणे खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. एकंदरीत खरीपपूर्व शेती हंगामाच्या तयारीस बळीराजा लागला असला तरी मृग नक्षत्र लागून तीन दिवस झाले तरी पाऊस येण्याचे चिन्हे नसल्याने तो हवालदील झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी