शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ठाम ! माघार घेणार नाहीत, विमानतळाला इंचभरही जमीन देणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:19 IST

Gadchiroli : आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनाला कळविण्यात येतील, अशी ग्वाही तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रस्तावित विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाविरोधात चंद्रपूर मार्गावरील मुरखळा येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने अकराव्या दिवशी तात्पुरते स्थगित झाले. मात्र, लढा सुरूच राहील, माघार घेणार नाहीत, बापजाद्यांनी कमावलेली इंचभरही जमीन देणार नाहीत... या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत.

विमानतळासाठी शहराजवळील नवेगाव, मुरखळा, पुलखल, मुडझा बु, व मुडझा तु या गावांमध्ये भूसंपादनाचा घाट घातलेला आहे. ग्रामसभांनी विमानतळाविरोधात ठराव घेतल्यानंतरही प्रशासनाने शेतकऱ्यांना नोटीस धाडल्या. त्यामुळे मुरखळाचे शरद ब्राम्हणवाडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी २८ एप्रिलपासून मुरखळा येथे बेमुदत उपोषण सुरू केले. ६ मे पासून शेती बचाव संघर्ष समितीसह महिलांनीही साखळी उपोषण सुरू करून आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान, ८ मे रोजी खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, माजी पं. स. सभापती मारोतराव इचोडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणताडे, काँग्रेस शहराध्यक्ष सतीश विधाते यांच्यासह तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्या उपस्थितीत सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले. 

१० वर्षापूर्वी विमानतळासाठी चामोर्शी रोडवरील शासकीय विज्ञान कॉलेजलगतच्या झुडपी जंगलाचे सर्वेक्षण झाले होते, तेथेच विमानतळ उभारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणारयावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी विकासाला विरोध नाही, पण झुडपी जंगल असताना सुपीक जमिनीचे अधिग्रहण करणे व्यवहार्य नाही, अशी भूमिका मांडली. आमदार रामदास मसराम यांनी येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे नमूद केले.

जमीन नाही म्हणजे नाही, आजीबाईंनी ठणकावलेआमच्या जमिनी घेणार आणि आम्हाला कुठे पाठविणार, असा सवाल ८० वर्षीय मीरा अर्जुन गेडाम यांनी केला. पोटतिडकीने बोलणाऱ्या आजीबाई पुढे म्हणाल्या, पुराच्या पाण्यात जमिनी गेल्या, तरीही नव्या जोमाने मेहनत करून आम्ही धान पिकवतो. आमच्या जमिनी घेऊन भूमिहीन करणार का, असा प्रश्नही त्यांनी केला. उद्योग, विमानतळ तुम्हाला लखलाभ, पण जमीन मिळणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAirportविमानतळ