शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईसाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मेडीगड्डा प्रकल्पासाठी तयार केलेला रस्ता व एल अँड टी कंपनीकडून शेतीच्या बाजूला तयार केलेला सिमेंट प्लाँट यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. प्लाँटमधून निघणाऱ्या धुरामुळे पिकाला व नागरिकांना हानी पोहोचत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर दोन लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी ...

ठळक मुद्देमेडीगड्डाचे प्रकल्पग्रस्त : पाच दिवसांपासून काम बंद; पीक व नागरिकांच्या आरोग्यास धोका

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मेडीगड्डा प्रकल्पासाठी तयार केलेला रस्ता व एल अँड टी कंपनीकडून शेतीच्या बाजूला तयार केलेला सिमेंट प्लाँट यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. प्लाँटमधून निघणाऱ्या धुरामुळे पिकाला व नागरिकांना हानी पोहोचत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर दोन लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाल्याने प्रकल्पाचे काम बंद आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, याकरिता गावकऱ्यांनी नायब तहसीलदार यांच्यासोबत २३ मे रोजी पोचमपल्ली गावात बैठक घेऊन प्रति एकर दोन लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, असा ठराव पारित केला. परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही नुकसान भरपाई देण्यात आली नाही.पोचमपल्लीच्या शेतकऱ्यांनी एल अँड टी कंपनीच्या मालवाहक वाहनांना अडविले असल्याने मागील पाच दिवसांपासून कामबंद आहे. चार दिवसांपूर्वी प्रकल्पाच्या अधिकाºयांना नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, त्यांनी वेळ मारून नेली. संबंधित अधिकारी तेलंगणात गेल्याचे बोलले जात आहे. मेडीगड्डा प्रकल्पात अंकिसा, आसरअल्ली, रंगधामपेठा, वडदम, दुब्बापल्ली आदी गावांचा समावेश आहे. या प्रकल्पात कामासाठी गावातील स्त्री व पुरूषांना ठेवण्यात आले आहे. मेडीगड्डा प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असल्याने माल वाहतूक करणारी वाहने राष्ट्रीय महामार्गावर थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे अन्य वाहनांच्या वाहतुकीसही अडथळा आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मेडीगड्डा प्रकल्प बांधण्याची परवानगी दिली त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी रवींद्र येरय्या सल्ला, रमेश पोचम सल्ला, श्रीनिवास राजाराम गोर्रे, विजेंद्र राजन्ना सल्ला, श्रीनिवास नारायण सल्ला व गावकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी