शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कारल्यावरील रोगांमुळे शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 01:28 IST

कारले पिकाच्या लागवडीपासूनच या पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारले पीक धोक्यात आले आहे.

लाखो रूपयांचे उत्पादन बुडाले : हजारो रूपयांचे कीटकनाशक फवारूनही रोग आटोक्यात येईना पुरूषोत्तम भागडकर  देसाईगंज कारले पिकाच्या लागवडीपासूनच या पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारले पीक धोक्यात आले आहे. मार्चपर्यंत लाखो रूपये उत्पन्न मिळवून देणारे कारल्याचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने देसाईगंज तालुक्यातील कारले उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. देसाईगंज तालुका गाढवी नदीमुळे दोन भागात विभागल्या गेला आहे. अर्ध्या भागातील शेतीला इटियाडोह धरणाच्या पाण्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. तर अर्ध्या भागात सिंचनाची सुविधा नसल्याने यातील बहुतांश जमीन कोरडवाहू आहे. काही शेतकरी विहीर, कुपनलिका यांच्या माध्यमातून सिंचन करतात. पारंपरिक धान पिकाला बगल देत किन्हाळा, मोहटोला, डोंगरगाव (हलबी), पोटगाव, विहिरगाव, अरततोंडी, उसेगाव, कुरूड, कोंढाळा आदी गावातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती करण्यात सुरूवात केली. विशेष करून या भागात कारले पिकाची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नागपूरचे व्यापारी थेट गावी येऊन मालाची उचल करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजारपेठेपर्यंत माल नेण्याचा वेळ व खर्च वाचतो. दिवसेंदिवस कारले पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मार्चपर्यंत लाखो रूपयांचे उत्पादन कारले पिकाच्या माध्यमातून होत होते. यावर्षी मात्र वातावरण या पिकाच्या विरोधात आहे. अगदी लागवडीपासूनच कारले पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकरी आपल्या पध्दतीने किटकनाशकांची फवारणी करून रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र दिवसेंदिवस कारले पीक रोगांचाच्या गर्तेत सापडत चालला आहे. उत्पादन तर सोडाच कीटकनाशकांवर झालेला हजारो रूपयांचा खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन नाही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुकास्तरावर कृषी विभाग असला तरी या विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या कधीच जाणून घेत नाही. केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे रंगविण्याचे काम या विभागाचे कर्मचारी व अधिकारी करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असतानाही एकाही कृषी सहायकाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही. कृषी केंद्र चालक जे कीटकनाशक लिहून देतील, तेच कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, यासाठी शासन अनेक योजना राबविते. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकरी स्वत:हून विविध पिकांचे उत्पादन घेत असतानाही कृषी विभागाचे अधिकारी मात्र त्यांना कोणतेही मार्गदर्शन करीत नसल्याचे विपरित परिस्थिती दिसून येत आहे.