शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी नंबरसाठी भरतात वर्षाकाठी 14 लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

नोकरदार वर्गाला वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या पगारात अलीकडच्या काही वर्षात बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या राहणीमानातही आमुलाग्र बदल झाला आहे. आर्थिक सुबत्तेसोबत भौतिक गरजाही वाढत असल्यामुळे कर्मचारी वर्गात आता चारचाकी वाहनाची खरेदी सर्रास होत असल्याचे दिसून येते. यासोबतच युवा वर्गात नवनवीन दुचाकी वाहनांची क्रेझ वाढली आहे. वाहनांचा हा शौक पूर्ण करताना आपले वेगळेपण दिसण्यासाठी किंवा काही जण आपला ‘लकी’ नंबर म्हणून विशिष्ट नंबर आपल्या वाहनाला मिळावा यासाठी प्रयत्नशिल असतात.

ठळक मुद्दे७५० व ७८६ नंबरला जिल्ह्यात सर्वाधिक मागणी

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसेंदिवस दुचाकींसह चारचाकी वाहनांची संख्या वाढत असताना आपल्या वाहनाला विशिष्ट नंबर असावा याकडेही अनेकांचा कल असतो. त्यासाठी हजारो रुपये मोजण्याची त्यांची तयारी असते. गेल्या दोन वर्षात अशा फॅन्सी नंबरसाठी परिवहन विभागाकडे भरल्या गेलेल्या शुल्कावर नजर टाकल्यास वर्षाकाठी १४ लाख रुपये शुल्क वाहनधारक भरत असल्याचे दिसून येते. नोकरदार वर्गाला वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या पगारात अलीकडच्या काही वर्षात बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या राहणीमानातही आमुलाग्र बदल झाला आहे. आर्थिक सुबत्तेसोबत भौतिक गरजाही वाढत असल्यामुळे कर्मचारी वर्गात आता चारचाकी वाहनाची खरेदी सर्रास होत असल्याचे दिसून येते. यासोबतच युवा वर्गात नवनवीन दुचाकी वाहनांची क्रेझ वाढली आहे. वाहनांचा हा शौक पूर्ण करताना आपले वेगळेपण दिसण्यासाठी किंवा काही जण आपला ‘लकी’ नंबर म्हणून विशिष्ट नंबर आपल्या वाहनाला मिळावा यासाठी प्रयत्नशिल असतात. परिवहन विभागाने अशा फॅन्सी नंबरप्रेमींसाठी विशिष्ट शुल्क भरून हवा तो नंबर घेण्याची सुविधा केली आहे.गडचिरोली जिल्ह्यात ७५० आणि ७८६ या दोन नंबरला विशेष मागणी आहे. यापैकी ७५० हा नंबर आदिवासी समाजबांधवांना हवा असतो. संपूर्ण भारतात आदिवासी समाजाच्या ७५० गोत्र जाती आहेत. त्याचे प्रतीक म्हणून हा आकडा त्यांना हवा असतो. तर ७८६ हा आकडा मुस्लिम समाजबांधव लकी समजतात. त्यामुळे या नंबरसाठी लोक शुल्क भरण्यास तयार असतात. सध्या चारचाकी वाहनांसाठी दीड ते तीन लाख रुपये आणि दुचाकी वाहनासाठी २० ते ५० हजार रुपये शुल्क आकारले जात आहे.

अनेक फॅन्सी नंबर शिल्लकफॅन्सी नंबरची क्रेझ वाहनधारकांमध्ये असली तरी काही नंबरसाठी तब्बल ३ लाख रुपये (चारचाकी वाहनासाठी) पर्यंत शुल्क आहे. एवढे शुल्क भरण्याची गडचिरोलीकरांची  मानसिकता नसल्यामुळे अनेक फॅन्सी नंबर तसेच पडून आहेत. ही स्थिती टाळण्यासाठी जिल्हानिहाय वेगवेगळे दर असावेत अशी अपेक्षा अनेक नंबरप्रेमी वाहनधारकांनी व्यक्त केली. शुल्क कमी केल्यास एकही नंबर शिल्लक राहणार नाही, अशी भावना अनेक वाहनधारकांनी व्यक्त केली.

गडचिरोली जिल्ह्यात फॅन्सी नंबरसाठी शुल्क भरणारे वाहनधारक असले तरी ते मर्यादित आहेत. या जिल्ह्यातील सामान्य माणसाची क्षमता पाहून फॅन्सी नंबरचे दर कमी ठेवल्यास आणखी जास्त लोकांना हे नंबर घेणे शक्य होईल आणि महसुलातही वाढ होईल. जिल्हानिहाय वेगवेगळे दर ठेवताना तो नंबर त्याच जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वाहनधारकाला मिळण्याची अट असावी. - रविंद्र भुयारउपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस