शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील गाव पाटलाचे नऊ जणांचे कुटूंब रात्रीतून रहस्यमरित्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 16:33 IST

धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणार्या भटमरयान या गावचे पाटील शंकर आचला आणि त्यांची मुले, सुना व नातवंडे असे संपूर्ण कुटुंबातील नऊ जण एका रात्रीतून बेपत्ता झाले आहेत.

नक्षल्यांची धमकी की पोलिसांचा जाच? गावकऱ्यांमध्ये तर्कवितर्काला उधाणलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणार्या भटमरयान या गावचे पाटील शंकर आचला आणि त्यांची मुले, सुना व नातवंडे असे संपूर्ण कुटुंबातील नऊ जण एका रात्रीतून बेपत्ता झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून ते कुठे गेले आहेत आणि कोणत्या अवस्थेत आहेत याची कोणालाच माहिती नसल्यामुळे तर्क वितर्कांना उधाण आले आहे.शंकर आचला यांची गावात जवळपास ५० एकर शेती आहे. त्यांचा मोठा मुलगा त्याच्या कुटुंबासह मानापूर (दे) येथे राहतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्र मांकाचा मुलगा आणि सुनांसह ते भटमरयान येथे राहतात. ५ दिवसांपूर्वी ते आपली दोन्ही विवाहित मुले, दोन सुना, तीन नातवंड आणि पत्नी यांच्यासह घराला कुलूप लावून रात्री गायब झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे पाळीव प्राणीही घराच्या आवारात बेवारस अवस्थेत आहेत. ते असे अचानक कुठे गेले, कशामुळे गेले याबाबत कोणालाच माहिती नाही. गावातील त्यांचे नातेवाईकही त्यांचा शोध घेत आहेत.प्राप्त माहितीनुसार, आचला यांच्याकडे आधी नक्षल्यांचे जाणे-येणे असायचे. त्यातून ८ दिवसांपूर्वीच पोलीस त्यांच्याकडे चौकशीसाठी आले होते. नक्षल्यांबद्दल आम्हाला माहिती द्या, नाहीतर तुमच्या कुटुंबाला नक्षल समर्थक म्हणून अटक करू असा दम पोलिसांनी भरला होता, अशी चर्चा गावात आहे. मात्र यासंदर्भात पोलिसांना विचारले असता आचला हे नक्षल्यांच्या भितीने कुठेतरी गेले असल्याचे ते म्हणाले.

आचला कुटुंबियांना पोलिसांनी नाही तर नक्षल्यांनी धमकावले आहे. त्या भितीतून ते सुरक्षित स्थळी कुठेतरी गेले आहेत. ते नेमके कुठे आहेत याची आम्हालाही माहिती नाही. खरे म्हणजे गावकऱ्यांनीच आचला यांच्याबद्दल नक्षल्यांचे कान भरले आहेत. त्यामुळे त्या कुटुंबियांवर ही वेळ आली आहे.- रणजित पाटीलउपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा

टॅग्स :naxaliteनक्षलवादी