शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडून म्हशीचा मृत्यू

By admin | Updated: May 25, 2014 23:33 IST

आष्टीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या मार्र्कं डा कं. येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या खुल्या आवारात ३ ते ४ वर्षापासूनचे धान्य उघड्यावर आहे. उघड्यावरील धान्य खाण्यासाठी गेलेल्या म्हशीचा

आष्टी : आष्टीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या मार्र्कं डा कं. येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या खुल्या आवारात ३ ते ४ वर्षापासूनचे धान्य उघड्यावर आहे. उघड्यावरील धान्य खाण्यासाठी गेलेल्या म्हशीचा तोल अचानक विहिरीत गेल्याने पडून मृत्यू झाला.

शनिवारी राजेश्‍वर मलय्या जागरवार यांनी आपल्या म्हशी जंगलात चराईकरिता सोडल्या होत्या. उन्हाळय़ाचे दिवस असल्याने म्हशी पाण्याच्या शोधात भटकल्या. त्यामुळे रात्र उलटूनही म्हशी घरी न परतल्याने जागरवार यांनी म्हशींची शोधाशोध सुरू केली. तेव्हा काही म्हशी धान्याच्या ढिगार्‍यावर चढून धान्य खातांना दिसल्या. ढिगार्‍यावर असलेल्या म्हशींना जागरवार यांनी घरी आणले. परंतु एका म्हशीचा पत्ता न लागल्याने चौकीदारास विचारले असता विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला असे सांगितले. रात्रीच्या सुमारास टॉर्च लावून विहिरीत पाहिले असता काहीच आढळले नाही. परंतु सकाळी पाहिले तर म्हैस मृतावस्थेत आढळली. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या आवारात ३ वर्षापासून खरेदी करण्यात आलेले धान्य सडल्याने जनावरे धान्य खाण्यासाठी धान्याच्या ढिगार्‍यावर चढतात. जनावरांच्या बंदोबस्तासाठी संरक्षक भिंत अथवा कुंपणही नसल्याने जनावरे ढिगावर सहज चढतात व धान्य खातात. धान्याच्या आवाराला कुंपण नसल्यानेच म्हशीचा मृत्यू झाला. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने म्हशीचे मालक राजेश्‍वर जागरवार यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर घटनेच्या संदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हशीचा मृत्यू झाल्याने जागरवार यांचे २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. जागरवार यांना संस्थेच्यावतीने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तंटामुक्त समितीच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)