शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दारु कारखान्याचा केला पर्दाफाश, धर्मा रॉय ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:05 IST

Gadchiroli : २५ वर्षांपासून तस्करी, रॉयवर १५ गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यातील जंगलातील घनदाट कुडकेली परिसरात बनावट दारु कारखान्याचा गुन्हे शाखेने १४ रोजी रात्री पर्दाफाश केला. याप्रकरणी धुळ्याच्या चौकडीला अटक केली होती तर दोघे अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत पळाले होते. दरम्यान, पोलिसांनी मुख्य सूत्रधार कुख्यात दारू माफिया धर्मा निमाय रॉय (३८, रा. चामोर्शी) व त्याचा सहकारी शुभम सपन बिश्वास (२६, रा. ताडगाव ता. भामरागड) याच्या १६ मे रोजी मुसक्या आवळल्या. 

कुडकेली हा नक्षलग्रस्त परिसर असून तेथील जंगल परिसरात बनावट देशी दारूचा कारखाना सुरु केल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरून जवळपास ४० लाखांच्या मुद्देमालासह वसंत प्रदान पावरा (१९, रा.बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे, शिवदास अमरसिंग पावरा (३५, रा.धाबापाडा, ता. शिरपूर, जि. धुळे), अर्जुन तोयाराम अहिर (३३ रा. धुळे), खीद्र नारायण पावरा (१८, रा. सलाईपाडा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांना ताब्यात घेतले. १६ रोजी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कुख्यात दारू तस्कर धर्मा रॉय आणि त्याचा साथीदार शुभम बिश्वास याच्या इशाऱ्यावर तेथे बनावट दारुचा उद्योग सुरु होता. 

२५ वर्षांपासून तस्करी, रॉयवर १५ गुन्हे दाखलजिल्ह्यातील दारु तस्करीत धर्मा रॉय हे कुप्रसिध्द नाव आहे. त्याच्यावर २५ वर्षांच्या गुन्हेकारकीर्दीत १५ गुन्हे नोंद आहेत. अल्पवयातच तो या धंद्यात उतरला होता. सन २००० मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा नोंद झाला. सुरुवातीला छोटी-मोठी तस्करी करणाऱ्या रॉयने अल्पावधीत या धंद्यात जम बसवला. राजकीय नेत्यांसोबत त्याची उठबस आहे. दक्षिण गडचिरोलीतील पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी हितसंबंध निर्माण करत त्याने बनावट दारु कारखाना थाटण्यापर्यंत मजल मारली. गेल्या काही दिवसांत भूमिगत राहून तो रॅकेट चालवायचा. अखेर त्याच्या हाती बेड्या पडल्या. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली