लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे भाजप खासदार अशोक नेते यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट बनवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून केला जात आहे. यासंदर्भात खा.नेते यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.‘अशोक नेते एमपी’ अशा इंग्रजीतील नावाने असलेल्या त्या अकाऊंटच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे मागितल्याच्या तक्रारी आपल्याला मिळाल्याचे खा.नेते यांनी तक्रारीत म्हटले आहे. नागरिकांनी जागरूक राहून आपल्या नावाने कोणताही पैशाचा व्यवहार करू नये. आपल्या नावाचा गैरवापर करून बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर पोलिसांनी कायदेशिर कारवाई करावी, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान ते अकाऊंट बंद करण्याची सूचना दिली असून लवकरच पुढील कारवाई होईल, असे सायबर गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित राठोड यांनी सांगितले.
अशोक नेतेंच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 20:33 IST
गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे भाजप खासदार अशोक नेते यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट बनवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून केला जात आहे. यासंदर्भात खा.नेते यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अशोक नेतेंच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट
ठळक मुद्देपैसे उकळण्याचा प्रयत्न