(बॉक्स)
कार्यक्रम घेताय? आधी हे नियम वाचा
सर्व चित्रपटगृहे, मॉल्स, खरेदी संकुले, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, प्रेक्षागृहे, सभागृह, रेस्टॉरंट आदी ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. मात्र रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा चालू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांत एकत्र येण्यास बंदी राहणार आहे. त्याचे उल्लंघन केल्यास जागा मालकावर दंडात्मक कारवाईसोबत ती जागा सील केली जाणार आहे. विशेष म्हणजे लग्नासाठीही ५० लोकांची मर्यादा राहणार आहे. त्याचे उल्लंघन केल्यास लॉन, मंगल कार्यालय, सभागृह मालकावर कारवाई होणार आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठीही २० लोकांची मर्यादा घालून दिली आहे.
(बॉक्स)
सरकारी कार्यालयात १०० टक्के, खासगीला ५० टक्के उपस्थिती
३१ मार्चपर्यंत खासगीसह सरकारी कार्यालयातही ५० टक्के उपस्थितीचा नियम लागू आहे. मात्र १ एप्रिलपासून सरकारी कार्यालयात १०० टक्के कर्मचारी उपस्थिती अनिवार्य राहणार असून खासगी आस्थापना ५० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी चेहऱ्यावर मास्क, रुमाल बांधणे गरजेचे राहणार आहे.