न्यायाधीशांचे प्रतिपादन : रामपूर येथे कायदेविषयक मार्गदर्शन अहेरी : नागरिकांनी कायद्याचे ज्ञान घेऊन सामाजिक बांधिलकीने समाजातील लोकांमध्ये त्यांची जनजागृती करावी, असे आवाहन न्या. दीपक कळसकर यांनी केले. राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रामपूर येथे आयोजित ‘समाज उपयोगी कायदेविषयक परिचर्चा’ कार्यक्रमात ते बोलत होते. राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरादरम्यान उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य मनोरंजन मंडल होते. यावेळी अॅड. ए. ए. शिखरे, अॅड. जैैनवार, अॅड. मेंगनवार, अॅड. गलबले, प्रा. विजय खोंडे उपस्थित होते. कार्यक्रमात मूलभूत कर्तव्य व कायदे यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिवक्त्यांनी विविध कायद्याचा समाजासाठी असलेला उपयोग तसेच सुदृढ निर्मितीसाठी असलेले कायदे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विजय खोंडे तर आभार प्रा. तानाजी मोरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
समाजात कायद्याचे ज्ञान पोहोचवा
By admin | Updated: January 23, 2017 00:58 IST