शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात; आता नगरपंचायतीतही प्रशासकराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 15:11 IST

९ ठिकाणी तहसीलदारांची नियुक्ती: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगरपालिकांमध्ये सुमारे तीन वर्षांपासून प्रशासकराज आहे. उर्वरित ९ नगरपंचायतीतील पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने तहसीलदारांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. १२ ऑगस्टला जिल्हाधिकारी संजय दैने यांनी हे आदेश काढले.

जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज येथे नगरपालिका असून कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड येथे नगरपंचायत आहे. नगरपालिकेतील शेवटची पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये झाली होती.

पाच वर्षांचा कालावधी उलटून तीन वर्षे झाल्यानंतरही आरक्षणावरून निर्माण झालेल्या गुंत्यामुळे निवडणुका झालेल्या नाहीत. तथापि, जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूक २० जानेवारी २०२२ रोजी पार पडली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांची अडीच वर्षासाठी निवड झाली होती. ही प्रकिया काही ठिकाणी १४ फेब्रुवारी २०२२ तर काही ठिकाणी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडली होती. या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १४ व १५ ऑगस्ट २०२४ रोजी रोजी पूर्ण होत आहे. नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदार हे आता नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

नगराध्यक्षपदाची सोडत न झाल्याने प्रशासकनगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आहे. तेथे नगराध्यक्षपदाची सोडत अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम ६० नुसार प्रशासकांची नियुक्ती केली आहे.

ध्वजारोहण करण्याची संधी हुकलीयंदा स्वातंत्र्य दिनाचा ७७वा वर्धापन दिन गुरुवारी आहे. काही नगरपंचायतीत पूर्वसंध्येला तर काही ठिकाणी त्याच दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी संपत आहे. त्यामुळे ध्वजारोहण करण्याची पदाधिकाऱ्यांची संधी हुकली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर