शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पाणलोटच्या कामांवर ५४ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जाते. जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपयोजनेअंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी दरवर्षी निधी उपलब्ध होत असतो. या निधीतून पाणलोटाची कामे केली जाते.

ठळक मुद्देबोडी, बंधारा व मजगीतून सिंचन सुविधा : कृषी विभागाकडून गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १९८० च्या वनकायद्यान्वये जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे शासनाच्या सिंचन विकासाच्या विविध योजनेतून शेती विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात मजगी, बोडी नूतनीकरण, मातीनाला बांध, वळण बंधारा आदींच्या कामावर दोन वर्षात एकूण ५४ लाख ८३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जाते. जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपयोजनेअंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी दरवर्षी निधी उपलब्ध होत असतो. या निधीतून पाणलोटाची कामे केली जाते.जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून सन २०१८-१९ या वर्षात गडचिरोली तालुक्यात एक, मुलचेरा तालुक्यात एक व आरमोरी तालुक्यात दोन अशी पाणलोटाची एकूण चार कामे करण्यात आली. या कामांवर ३६.५७ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील कामांवर ९.८६ लाख, मुलचेरातील ८ लाख ४४ हजार व आरमोरीतील दोन कामांवर १८.२७ लाख रुपयांचा खर्च प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.सन २०१९-२० या वर्षात केवळ सिरोंचा तालुक्यात पाणलोटाची दोन कामे करण्यात आली. या कामांवर १८.२६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. सन २०१८-१९ व २०१९-२० हे दोन वर्ष मिळून एकूण पाणलोटांच्या कामावर ५४.८३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.पाणलोट क्षेत्रातील जमिनीचा उपयोग सध्या कसा केला जात आहे, याचा अभ्यास करणे व जमिनीच्या उपयोगीता क्षमतेनुसार भविष्यात जमिनीचा उपयोग कसा करावा, याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. जमिनीच्या होणाऱ्या उपयोगावर, त्यावर घेतली जाणारी पीक, पीक लागवडीची पद्धत यावर त्या पाणलोट क्षेत्रातील पाणलोटाचा वापर जलअंत:सरण व निचरा अवलंबून असतो. जमिनीची होणारी धूप, धुपेचा प्रकार, धुपेची तीव्रता देखील काही प्रमाणात यावरून ठरत असते. पाणलोटाची कामे झालेल्या क्षेत्रात पावसाचे पाणी अधिकाधिक जिरविले जाते. त्यामुळे जमिनीची जलधारणा व निचरा, सुपिकता वाढत असते. कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणलोट विकासाच्या कामातून शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढली असून याचा फायदा विविध पीक घेण्यासाठी होत आहे.अखर्चीत ४३ लाखांचा निधी डीपीसीकडे वळतागतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २०१९-२० मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदिवासी उपयोजनेतून ९८.६४ लाख रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला. या निधीमधून मजगी, बोडी नूतनीकरण, माती नाला बांध, वळण बंधारा आदी जलसंधारणाची कामे ३६ पाणलोटात करण्यात आली. या कामांवर ५४.८३ लाख रुपयांचा खर्च झाला. मात्र उर्वरित निधी ई टेंडरींग प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे तसेच गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा निधी खर्च करता आला नाही. परिणामी अखर्चीत ४३.८१ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडे समर्पित करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.धडक सिंचन विहिर योजनेतून भाजीपाल्याची लागवडशासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजना व धडक सिंचन विहीर योजनेतून शेतकºयांना अनुदानावर सिंचन विहिरीचा लाभ दिला जातो. गडचिरोली, चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील बºयाच शेतकºयांनी सदर दोन्ही योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेतला. सिंचन विहिरीवर मोटारपंप बसवून या माध्यमातून आता रबी हंगामात भाजीपाला पिकाची लागवड करणे शेतकºयाने सुरू केले आहे. सद्य:स्थितीत गडचिरोली, चामोर्शी शहरातील दैनंदिन गुजरी बाजारात शेतकºयांच्या शेतातूनच भाजीपाल्याची आवक होत आहे. पूर्वी हा सर्व भाजीपाला नागपूर शहरातून वाहनाद्वारे आणला जात होता. वैरागड परिसरातही पालेभाज्यांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक