शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

मतदान व नामांकनावर बहिष्कार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

गावांसाठी तीन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्या, असा प्रस्ताव मागील दीड वर्षापासून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात धूळखात पडला आहे. शासन व प्रशासन या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने २९ मार्चला होणाऱ्या ग्रा.पं.निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.

ठळक मुद्देसिर्सीवासीयांचा निर्णय : ग्रा.पं.विभाजनाचा प्रश्न कायम; आयुक्तांकडे प्रस्ताव धूळ खात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत सिर्सी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आठ गावांचा समावेश आहे. ग्रा.पं.चे विभाजन करून आठ गावांसाठी तीन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्या, असा प्रस्ताव मागील दीड वर्षापासून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात धूळखात पडला आहे. शासन व प्रशासन या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने २९ मार्चला होणाऱ्या ग्रा.पं.निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.यासंदर्भात सिर्सी गावातील नागरिकांनी थेट गडचिरोलीचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सोमवारी नायब तहसीलदारांना निवेदन दिले. सिर्सी ग्रा.पं.च्या निवडणुकीत एकही व्यक्ती नामांकन दाखल करणार नाही तसेच मतदान करणार नाही, असे स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना विश्वेश्वर दर्रो, लुमेश रोहणकर, उमाजी भुसारी, सुरेश फुकटे, नेवचंद सेलोटे, अशोक फुकटे, टिकाराम मडावी, प्रकाश भुसारी यांच्यासह विहीरगाव, नरोटी चक, गणेशपूर, सिर्सी आदी गावातील नागरिक उपस्थित होते.सिर्सी ग्रामपंचायतीअंतर्गत सिर्सी, गणेशपूर नं.१, गणेशपूर नं.२, मोहटोला कुकडी, विहीरगाव, नरोटी माल, नरोटी चक आदी गावांचा समावेश होतो. ग्रा.पं. मुख्यालयापासून नरोटी हे गाव १० किमी अंतरावर आहे. विहीरगाव, मोहटोला, कुकडी येथील गावकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामासाठी ७ ते ८ किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नरोटी माल व नरोटी चक अशी दोन गावे मिळून एक ग्रामपंचायत आहे. एक ग्रामपंचायत, विहीरगाव, कुकडी, मोहटोेला या तीन गावांसाठी एक ग्रामपंचायत व सिर्सी, गणेशपूर नं.१, गणेशपूर नं.२ या तीन गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.सिर्सी ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण कराव्या, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण न झाल्याने नागरिकांनी यंदाच्या ग्रा.पं. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. मागणीच्या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त नागपूर, तहसीलदार आरमोरी, बीडीओ आरमोरी व पोलीस निरीक्षकांना पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक