गडचिरोली तालुक्यातील करमटोला येथे साेमवारला पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात शिवसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी कात्रटवार म्हणाले, शिवसेनेचा जन्म गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा निखारा हातात घेऊन पुढे जाणारे आम्ही शिवसैनिक जनतेच्या न्याय्य हक़्कांसाठी रस्त्यावर उतरतो. सत्ता असो वा नसो, आमचे जनसेवेचे कार्य अविरत सुरू राहील. शिवसंपर्क अभियानाचा मुख्य उद्देश जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करणे हा आहे.
यावेळी सहसंपर्कप्रमुख विलास कोडापे, सुनील पोरेड्डीवार, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, शिवसेना उपतालुकाप्रमुख यादव लोहबरे, संजय बोबाटे, योगेश कुडवे, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, निकेश लोहंबरे, नीलकंठ मेश्राम, अमोल मेश्राम, गणेश दहेलकर, गणेश पिठाले, संदीप भुरसे, किशोर गेडाम, सुभाष ठाकरे, प्रशांत लोहबरे, गोपाल पानसे, सचिन भुसारी, संजय चांग, माणिक पाटील-ठाकरे, दिवाकर करकडे, अरुण वलादी, यादव करकाडे, हिवराज उन्दिरवाडे, यशवंत चुधरी, रामदास मुरतेली, पांडुरंग वलादे, रवीन्द्र ठाकरे, गोविंद कोडापे, गजानन बावने, महेश झोड़े, निरंजन लोहबरे, विलास दजगये, रामदास बहयाळ, भास्कर ठाकरे यांच्यासह करमटोला येथील ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.