शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

३४ बोअरवेलचे खोदकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४२ लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून १७ प्रभागांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३४ बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे.

ठळक मुद्देअहेरी नगर पंचायत : ४२ लाखांच्या निधीतून विविध वॉर्डांमध्ये पाण्याची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शहरातील विविध भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होत असे. नागरिक सकाळपासूनच जलस्त्रोतांवर पाण्याकरिता गर्दी करायचे. पाणी संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने शहरातील विविध वॉर्डात एकूण ३४ बोअरवेलच्या खोदकामास सुरूवात झाली आहे. ४२ लाख रूपयांच्या खर्चातून नागरिकांसाठी ही सुविधा करण्यात येत आहे.अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४२ लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून १७ प्रभागांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३४ बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. गेल्या आठ दिवसांत २० बोअरवेलचे खोदकाम झाले. उर्वरित बोअरवेलचे खोदकाम आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. एकाचवेळी संपूर्ण शहरातील विविध भागात एवढ्या संख्येने बोअरवेलचे खोदकाम करणारी अहेरी ही राज्यातील पहिलीच नगर पंचायत आहे.१७ प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. नगर पंचायत हद्दीत समाविष्ट असलेल्या गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली आदी तिन्ही गावात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण व्हायची. फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे. येथील नागरिकांना गावालगतच्या नाल्यावरून पाणी आणावे लागत असे. अनेक दिवसांपासून नागरिकांनी बोअरवेल खोदकाम करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन या ठिकाणी बोअरवेलचे खोदकाम होत असल्याने नागरिकांची पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.अहेरी शहरातील अनेक वॉर्डांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण व्हायची. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने अनेक दिवसांपासून पुढाकार घेतला. परंतु पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरील कामे रखडली. अनेक कामे विचाराधीन आहेत. परंतु आता शहरातील मूलभूत समस्या प्राधान्याने लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल.- हर्षा ठाकरे, नगराध्यक्ष, नगर पंचायत अहेरी

टॅग्स :water shortageपाणीकपात