शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांची तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:52 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत ‘स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा’ हा कार्यक्रम सुरू झाला असून या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाची प्रकल्प कार्यालयाच्या पथकांमार्फत २७ नोव्हेंबरपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरात प्रत्यक्ष पाहणी : पथक घेताहेत सोयीसुविधांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत ‘स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा’ हा कार्यक्रम सुरू झाला असून या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाची प्रकल्प कार्यालयाच्या पथकांमार्फत २७ नोव्हेंबरपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये पुरेशा सोयीसुविधा आहेत काय, याची प्रत्यक्ष पाहणी पथकातील अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.आदिवासी विकास विभागामार्फत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विविध सोयीसुविधांचा आढावा पथकांमार्फत घेतला जात आहे. आश्रमशाळा व वसतिगृहांची दुरूस्ती करण्यासाठी तसेच सोयीसुविधेत वाढ करण्यासाठी ंआराखडा तयार केला जात आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी आश्रमशाळास्तरावर पथक रवाना करण्यात आले आहे. या पथकात अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, आदिवासी बांधकाम कक्ष व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विभागातील सल्लागार व सीएम फेलो यांचा समावेश आहे.आदिवासी विकास विभागांतर्गत गडचिरोली प्रकल्पात २४, अहेरी प्रकल्पात ११ व भामरागड प्रकल्पात ८ अशा एकूण ४३ शासकीय आश्रमशाळा आहेत. गडचिरोली प्रकल्पात २१, अहेरी प्रकल्पात ८ व भामरागड प्रकल्पात ४ असे एकूण ३३ शासकीय वसतिगृह आहेत.वेगवेगळ्या पथकात प्रकल्पातील सहायक प्रकल्प अधिकारी, कार्यालय अधीक्षक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, आदिवासी विकास निरीक्षक तसेच काही कर्मचारी, सीएफआर प्रतिनिधी, आदिवासी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांमार्फत आश्रमशाळा व वसतिगृहांची प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली आहे. आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, शाळेतील कर्मचारी व गृहपालांशी प्रत्यक्ष चर्चा करून या पथकातील कर्मचारी सोयीसुविधांचा आढावा घेत आहेत. सोयीसुविधा दुरूस्ती व सुधारणा करण्याबाबतचा तयार केलेला अहवाल तिनही प्रकल्प कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.गडचिरोली प्रकल्पात २७ नोव्हेंबरपासून ही तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून प्रत्येक दिवशी नेमलेले पथक नियोजनाप्रमाणे प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांना भेटी देत आहेत. कायापालट पथकाच्या तपासणी अहवालावरून गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सर्व आवश्यक भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागाने हे कायापालट अभियान सुरू केले आहे. सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे सदर तपासणी मोहिमेवर लक्ष आहे. सदर तपासणी पथकात सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांचाही समावेश आहे.या सुविधांची केली जातेय पडताळणीया पथकामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह इमारतीचे बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, शालेय इमारत, वसतिगृह, स्वयंपाकगृह, भोजन कक्ष, कोठीगृह, फर्निचर, पलंग व आवश्यक सर्वसोयीसुविधा तपासल्या जात आहेत. ज्या आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे, अशा ठिकाणी नव्याने सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :Schoolशाळा