शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

त्रेता युगाच्या महानायकाचा सर्वत्र जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:00 IST

चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआऊट आणि भगवे झेंडे लावले होते. त्या ठिकाणी अनेक जण थांबून कटआऊटपुढे नतमस्तक होत होते.

ठळक मुद्देजिल्हाभरातील राम मंदिरांमध्ये दीपोत्सवासह भजन-पूजन, ठिकठिकाणी मिठाईचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : श्रीराम जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या अयोध्येतील जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात मिटल्यानंतर उभारल्या जात असलेल्या भव्यदिव्य राम मंदिराच्या पायाभरणीचा क्षण बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आणि विविध कार्यक्रमांनी साजरा केला.ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये सकाळपासून भजनासह रामनामाचा गजर सुरू होता. काही मंदिरांमध्ये फुलांची सजावट केली होती. गडचिरोली शहरासह आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, अहेरी, सिरोंचा, कुरखेडा आदी ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.गडचिरोली शहरातील गुजरीजवळच्या श्रीराम मंदिरात सायंकाळी दिव्यांची आरास करून महिलांनी भजन सादर केले. चामोर्शी शहरातही आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण तयार झाले होते. देसाईगंजमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, तालुका अध्यक्ष राजू जेठानी, नरेश विठ्ठलानी, श्याम उईके, अनिल गुरफुले, अजय राऊत, प्रमोद शर्मा आदींनी फव्वारा चौकात नागरिकांना मिठाईचे वाटप केले.अहेरी येथे एकही राम मंदिर नाही. त्यामुळे अनेक दिवसांच्या रामभक्तांच्या इच्छेनुसार बुधवारी जागेची निवड करून नियोजित जागेवर मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्ट व श्रीराम सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआऊट आणि भगवे झेंडे लावले होते. त्या ठिकाणी अनेक जण थांबून कटआऊटपुढे नतमस्तक होत होते.दक्षिण गडचिरोलीत भागातील अहेरी, सिरोंचा येथेही जल्लोष करण्यात आला. सिरोंचा येथील बस स्थानक चौकात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेसमोर श्री रामनामाचा जयघोष करीत आतिषबाजी करण्यात आली. यावेळी भाजपसह श्रीराम सेना, रा.स्व.संघ, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अहेरी येथील शिवाजीनगरात श्रीराम मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला.अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर हे तमाम भारतीयांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा भाग आहे. ज्या गोष्टीला हजारो वर्षांचे पौराणिक दाखले आहेत त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागला. उशिरा का होईना अखेर भारतीयांना त्यांचा राम मिळाल्याचा आनंद सर्वांना होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच आज अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिराच्या पायाभरणीच्या मुहूर्तावर संपूर्ण भारतवासियांनी दिवाळीसारखा आनंद साजरा केला. गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या सर्व बुथस्तरीय कार्यकर्त्यांपासून सर्व पदाधिकाऱ्यांनी आजचा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला. सायंकाळी कार्यकर्त्यांनी घरोघरी दीप प्रज्वलन केले. त्यामुळे जणूकाही दिवाळीच साजरी होत असल्याचे जाणवत होते. देसाईगंजमध्ये दुपारी पावसाचा जोर कमी होताच मिठाई वाटप करण्यात आले. यात अनेक मुस्लिम बांधवांनीही आनंदाने तोंड गोड केले हे विशेष.- किशन नागदेवे, जिल्हाध्यक्ष, भाजपश्रीराम मंदिर भूमिपूजनाचा हा सोहळा सर्वांना सोबत पाहता आणि अनुभवता यावा म्हणून आमदार डॉ.देवराव होळी यांच्या संकल्पनेतून चामोर्शीत मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था केली होती. सायंकाळी चौकात ५ हजार लाडू आणि १० किलो पेढ्यांचा महाप्रसाद वाटण्यात आला. घराघरात दीप प्रज्वलन करण्यात आल्यामुळे चामोर्शीतील वातावरण हर्षोल्हासाने आणि भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाले. जणूकाही दिवाळीच आली, असा उत्साह नगरात दिसत होता.- दिलीप चलाख, चामोर्शी

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर