शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

टमाट्यांचे दर पाहून सर्वसामान्यांचे डोळे लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:52 IST

आष्टी येथे शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात टमाटेचे भाव ८० ते १०० रुपये किलो पोहोचले होते. चंद्रपूर शहर लॉकडाऊनमुळे टमाटे व इतर भाजीपाल्याची आष्टीच्या बाजारात आवक घटली होती. परिणामी भाववाढीने कहर केला. मागील आठवड्यात आष्टी येथील बाजारात ५० रुपये किलो दराने विकले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण चंद्रपूर शहर लॉकडाऊन करण्यात आले.

ठळक मुद्दे८० ते १०० रुपये किलो : चंद्रपूर शहरातील लॉकडाऊनचा परिणाम, मागणीच्या तुलनेत आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : कोरोना लॉकडाऊनच्या काळात मागील १५ दिवसांपासून टमाटेसह इतर पालेभाज्यांचे भाव प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लाल होत आहेत. आष्टी येथे शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात टमाटेचे भाव ८० ते १०० रुपये किलो पोहोचले होते. चंद्रपूर शहर लॉकडाऊनमुळे टमाटे व इतर भाजीपाल्याची आष्टीच्या बाजारात आवक घटली होती. परिणामी भाववाढीने कहर केला.मागील आठवड्यात आष्टी येथील बाजारात ५० रुपये किलो दराने विकले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण चंद्रपूर शहर लॉकडाऊन करण्यात आले. चंद्रपूर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे. परिणामी दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी येथील बाजारात चंद्रपूरच्या बाजारातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणल्या जातो. मात्र चंद्रपूर शहर लॉकडाऊन झाल्याने शुक्रवारी येथील बाजारात टमाट्याची आवक पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. परिणामी एकाही विक्रेत्याने प्रती किलो ८० रुपयांच्या खाली टमाटे विकले नाही. आजुबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांकडील भाजीपाला बाजारात आणण्यात आला. परिणामी पालेभाज्यांचेही भाव वाढले होते. चंद्रपूर शहरातील बाजारपेठ ३१ जुलैपर्यंत पूर्णत: बंद राहिल्यास आष्टी येथील बाजारात टमाटेचे भाव १२५ ते १५० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आष्टीच्या बाजारात चंद्रपूरच्या ठोक मार्केटमधून भाजीपाल्याची आवक दर आठवड्याला होत असते. मात्र तिथून आवक बंद झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत.चामोर्शी शहरात भरणाऱ्या दैनंदिन गुजरी बाजारातही गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव वधारलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून आवक बंद झाली आहे.गडचिरोलीतील गुजरी महागलीकोरोना लॉकडाऊनमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गडचिरोली शहर व जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ दर रविवारला कडकडीत बंद असते. परिणामी गडचिरोलीच्या दैनंदिन गुजरी बाजारात शुक्रवारी व शनिवारला ग्राहकांची भाजीपाला खरेदीसाठी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे येथे भाजीपाल्याचे भाव वधारलेले असतात. १७ जुलै रोजी शुक्रवारला येथील दैनंदिन गुजरी बाजारात टमाटे ८० रुपये किलो दराने विकले जात होते. वांगे ४० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये किलो, कोबी ८० रुपये किलो, आलू ४० रुपये किलो, कारले ८० रुपये किलो, चवळी शेंगा ५० ते ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत. पालक, मेथी, चवळी, भाजी व कोथिंबीरचे भावही वाढले होते.

टॅग्स :vegetableभाज्याcorona virusकोरोना वायरस बातम्या