शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

प्रसूतीनंतरही ‘त्या’ अभागी मातेचा बाळासह पायीच प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

तुर्रेमर्का ते लाहेरीपर्यंत २३ किलोमीटरचा प्रवास पायदळ केल्यानंतर रूग्णवाहिकेने हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालय गाठले आणि त्याच दिवशी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे हे दुसरे बाळंतपण होते. इतक्या लांब पायी चालून येणाऱ्या त्या गरोदर मातेला किमान जाताना प्रसुतीनंतर तरी आरामदायक प्रवास करून गावी जाता येईल असे सर्वांना वाटत होते. पण त्या अभावी मातेला परतीच्या प्रवासातही त्याच पद्धतीने पायपीट करावी लागली.

ठळक मुद्देपाचव्या दिवशी निघाली गावाकडे : ओल्या बाळंतीणीच्या हिमतीला अनेकांचा सलाम; वर्षानुवर्षे कायम असलेल्या व्यथांबद्दल मात्र चिड

रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : रुग्णालयात सुखरूप प्रसुती व्हावी म्हणून २३ किलोमीटरचे अंतर पायी चालत येऊन त्याच दिवशी प्रसुत झालेल्या अभागी मातेला प्रसुतीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी पुन्हा पायपीट करत आपले गाव गाठावे लागले. कोणतेही वाहन गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्याशिवाय दुसरा पर्याय तिच्याकडे नव्हता. आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची त्या मातेची हिंमत आश्चर्यात टाकणारी आहे. दुसरीकडे विपरित भौगोलिक परिस्थिती आणि कायम दुर्लक्षित अशा नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या व्यथांना अंतच नाही का? अशी संतप्त भावनाही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडा पलीकडे असलेल्या तुर्रेमर्का येथील रोशनी संतोष पोदाडी या महिलेने गेल्या शुक्रवारी (दि.३) तुर्रेमर्का ते लाहेरीपर्यंत २३ किलोमीटरचा प्रवास पायदळ केल्यानंतर रूग्णवाहिकेने हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालय गाठले आणि त्याच दिवशी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे हे दुसरे बाळंतपण होते. इतक्या लांब पायी चालून येणाऱ्या त्या गरोदर मातेला किमान जाताना प्रसुतीनंतर तरी आरामदायक प्रवास करून गावी जाता येईल असे सर्वांना वाटत होते. पण त्या अभावी मातेला परतीच्या प्रवासातही त्याच पद्धतीने पायपीट करावी लागली.प्रसुतीनंतर पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि.७) रोशनीला सुटी झाली. लोकबिरादरी रुग्णालयाने तिला गावी सोडून देण्यासाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयाला माहिती दिली. तेथून रुग्णवाहिका आली. सोबत डॉ.संभाजी भोकरे हेसुद्धा होते. त्या रुग्णवाहिकेने रोशनीसह तिचे बाळ, कुटुंबातील सदस्य आणि गावाकडून सोबत आलेली आशा सेविका पार्वती उसेंडी निघाले. पण लाहेरीच्या पुढे गुंडेनूर नाल्यापर्यंतच त्यांचे वाहन जाऊ शकले. पुढील १८ किलोमीटरचा प्रवास त्यांना पायीच करावा लागला. विशेष म्हणजे त्यात ७ ते ८ किलोमीटर अंतर हे डोंगरदऱ्यांचे आहे.अनेक महिला प्रसुतीनंतर सव्वा महिन्यापर्यंत घराबाहेरही निघत नाही. पण गडचिरोली जिल्ह्यात रोशनीसारख्या अनेक महिलांना प्रसुतीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी अनेक किलोमीटरची पायपीट करत गाव गाठावे लागते. या दुर्गम भागातील नागरिकांना विकासाची पहाट कोणत्या जन्मी पहायला मिळणार, अशी भावना नागरिकांमध्ये उमटत आहे. दरवर्षी अनेक महिलांना या परिस्थितीतून जावे लागते. मात्र परिस्थितीमध्ये बदल होत नाही.तारखेआधीच या, सर्व व्यवस्था करणारअनेक महिला प्रसुतीसाठी दिलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच दवाखान्यात येतात. पण दुर्गम भागामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे कोणत्याही गरोदर महिलेने १० ते १५ दिवस आधीच लोकबिरादरीच्या रुग्णालयात यावे, त्यांची राहण्याची-जेवणाची सर्व व्यवस्था रूग्णालयाकडून केली जाईल, असे आवाहन हेमलकसा येथील लोकबिरादरी रुग्णालयाच्या वतीने डॉ.दिगंत आमटे यांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGadchiroliगडचिरोली