शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिलावानंतरही शहरात रेतीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:51 IST

रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया आटोपून रेती काढण्यास सुरूवात झाली आहे. मात्र अजुनही रेतीचा तुटवडाच असल्याने बांधकामांना पाहिजे, त्या प्रमाणात गती आली नाही. विशेष म्हणजे, निम्म्या रेती घाटांचे लिलाव अजूनही झाले नाही.

ठळक मुद्देपुरवठा कमी प्रमाणात : कंत्राटदारांकडून साठवणूक करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया आटोपून रेती काढण्यास सुरूवात झाली आहे. मात्र अजुनही रेतीचा तुटवडाच असल्याने बांधकामांना पाहिजे, त्या प्रमाणात गती आली नाही. विशेष म्हणजे, निम्म्या रेती घाटांचे लिलाव अजूनही झाले नाही.राज्यस्तरीय पर्यावरण समितीने फेब्रुवारी महिन्यात ३३ रेती घाटांच्या लिलावाला परवानगी दिली. त्यानंतर रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली. लिलावाची प्रक्रिया जवळपास एक महिना चालली. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठड्यापासून रेती उपशाला सुरूवात झाली आहे. गडचिरोली शहराच्या सभोवताल जवळपास पाच रेती घाटांचे लिलाव झाले आहेत. मात्र रेती उपसा करण्यासाठी कालावधी कमी असल्याने कंत्राटदार सर्वप्रथम रेतीचा नदीतून उपसा करून तो एका ठिकाणी साठविण्यावर भर देत आहेत. एका महिन्यात पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. नदीमध्ये पाणी भरल्यानंतर रेतीचा उपसा करणे शक्य होणार नाही. रेती बाहेर निघाली नाही तर कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे कंत्राटदारांनी सर्व प्रथम रेतीचा उपसा करून त्याचा साठा करण्यावर भर दिला आहे. फार कमी ग्राहकांना रेती घरपोच पोहोचविली जात आहे. काही कंत्राटदार तर रेती आणून देण्यास स्पष्ट नकार देत आहेत.रेती घाट सुरू झाल्यानंतर भाव उतरतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र अजुनही अडीच ते तीन हजार रुपये प्रती ब्रास दराने रेतीची विक्री केली जात आहे. रेतीअभावी अनेकांच्या घरांची कामे थांबली आहेत. पुढील एक महिन्यात पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. तोपर्यंत घर बांधून पूर्ण होणार नसल्याने काही नागरिकांनी यावर्षी घर बांधकामाला स्थगिती दिली आहे. तर काहींनी केवळ फाऊंडेशन बांधण्याचा निर्णय घेतला आहे.३८ रेती घाटांच्या प्रस्तावांना मान्यता केव्हा?पर्यावरणाबाबत परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ३३ रेती घाटांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले होते. या सर्वच घाटांना परवानगी मिळाली. त्यापैकी २७ घाटांचे लिलाव झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३८ रेती घाटांना पर्यावरणाबाबत परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. एक महिन्याचा कालावधी उलटूनही या रेती घाटांना परवानगी मिळाली नाही. आता परवानगी मिळाल्यास रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यास एक महिना लागणार आहे. तोपर्यंत पावसाळा सुरू होते. पावसाळ्यात रेतीचा उपसा करणे शक्य नाही. त्यामुळे या रेती घाटांना कंत्राटदार मिळणे कठीण होणार आहे.

टॅग्स :sandवाळू