शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
4
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
5
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
6
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
7
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
8
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
9
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
10
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
11
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
12
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
13
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
14
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
15
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
16
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
17
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
18
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी
19
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
20
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीही सिरोंचा तालुक्यातील गावं पायवाटेवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:19 IST

Gadchiroli : रेगुंठा परिसरात रस्ता हरवला की सरकार?

सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात अद्यापही विकासाची गंगा पोहोचली नाही. सिरोंचा तालुक्यातील ७० किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा परिसरातील २० गावातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या गावाचा विकास कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे शासन 'मेक इन इंडिया'चा नारा देत ग्रामीण भागाचा विकास केल्याचा कांगावा करते. मात्र, दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनपर्यंत विकासाची गंगा पोहोचली नसल्याचे दिसून येते. सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसरात रेगुंठा, कोटापल्ली, मोयाबीनपेठा, नर्सिहापल्ली, पर्सेवाडा असे ५ ग्रामपंचायत असून या ५ ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास २० गावांच्या समावेश असून १५ ते १८ हजार लोक संख्या आसपास आहे.या परिसरात संपूर्ण आदिवासी बहुल आहे.परिसराला लागूनच एकीकडे घनदाट जंगल आणि दुसरीकडे प्राणहिता नदी आहे.या परिसरात ये जा करण्याऱ्या पर्सेवाडा बेज्जूरपल्ली मार्ग ब्रिटिश काळापासून तर अजूनपर्यंत पक्का रस्ता बनला नाही.त्यामुळे परिसरातील २० गावातील नागरिकांना शासकीय विविध कामानिमित्त सिरोंचा अहेरी तालुक्यात दररोज पर्सेवाडा बेज्जूरपल्ली मार्गाने जंगलातील पहाडीवरून वायवाटेनेचे आवगमान करावे लागत आहेत. विशेष म्हणजे या रस्त्याची रुंदी अत्यंत कमी असल्याने या रस्त्यावरून एकावेळी एकच वाहन जाऊ शकते, दुसरे वाहन जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो, या मार्गावरील पहाडीवर अधिक वळणे असल्याने अनेकदा परस्पर विरोधी दिशेने येणारे वाहन दिसत नाही.पर्सेवाडा बेज्जूरपल्ली फाटा सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय मार्गपर्यंत १५ किमी अंतर असून  मुळावाही ते पर्सेवाडा ५ किमी रस्त्यावर पूर्णपणे मोठमोठे दगड उखडले असून खड्डे सुद्धा पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मार्गावरून ये जा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पर्सेवाडा बेज्जूरपल्ली मार्गावर असलेल्या  नाल्यावर २०१७-१८ मध्ये ५ ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करण्यात आले,पुलाचे बांधकाम सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला होता.सदर पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर डांबरीकरण रस्ता होईल म्हणून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.मात्र सदर पुलाचे बांधकाम पूर्ण  होऊन ६ वर्ष झाले आहे.मात्र अजूनपर्यंत जोडरस्त्याचे बांधकाम झाले नाही.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.सदर रस्ताच्या बांधकाम लवकरात लवकर सुरू करून पर्सेवाडा बेज्जूरपल्ली मार्गाला ६३ क्रमांकाच्या मार्गाशी जोडावे अशी मागणी होत आहे.

पर्सेवाडा बेज्जूरपल्ली मार्गाने ये जा करणारे गावा रेगुंठा परिसरातील रेगुंठा,कोत्तूर, कोटापल्ली,नर्सिहापल्ली, मोयाबीनपेठा,पापईपल्ली, मुलादिम्या,येला,रामनापेठा,पिरमेडा,बोकटागुद्दाम,दारशेवाडा,पर्सेवाडा, चिक्याला, व बेज्जूरपल्ली परिसरात बेज्जूरपल्ली,मुळावाही,रेगुलवाही,जर्जपेठा,मोतकुपल्ली, सिलमपल्ली,उमानूर परिसरात उमानूर,सुद्धागुद्दाम,तिमराम,सिलमपल्ली,जोगनगुडा,मरपल्ली,कोत्तागुद्दाम,करांचा,तसेच जिमलगट्टा परिसरात जिमलगट्टा,गोविदगाव,एनकाबंडा,गुंडेरा,अर्कापल्ली,रसपल्ली, किष्टापूर,सेडा, देचालीपेठा, रेपनपल्ली, कामलापूरसह असे अनेक गावातील नागरिकांना या मार्गाने ये जा करण्यासाठी सोयीस्कर होईल.विशेष म्हणजे सिरोंचा अहेरी तालुक्यात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे.

"पर्सेवाडा ते बेज्जूरपल्ली फाटा सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गपर्यंत १५ किलोमीटर अंतर असून मुळावाही ते पर्सेवाडा ५ किलोमीटर रस्त्यावर पूर्णपणे मोठमोठे दगड उखडले असून खड्डे सुद्धा पडले आहेत. आणि रस्त्याची रुंदी अत्यंत कमी असल्याने एकावेळी दोन वाहने परस्परांना ओलांडू शकत नाहीत, टेकडी वळणावरील वाहने दिसून येत नाहीत,त्यामुळे वाहनधारकांना व प्रवसांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे."- गणेश बोधनवार तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदे गट

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली