शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

चामोर्शीत संपूर्ण बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 23:22 IST

औषधी दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने व बाजारपेठ पूर्णत: बंद होती. गुरूवारी प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांची रॅपिड टेस्ट केली. सकाळपासूनच तपासणीला सुरूवात झाली. येथील अंगणवाडीत दिवसभरात एकूण १०२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी २८ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरात ५६ पॉझिटिव्ह : चामोर्शीत अनेकांची तपासणी, पुन्हा २८ कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/चामोर्शी : बुधवारी करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये एकूण १७ व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्यानंतर चामोर्शी शहरात दहशतीचे सावट पसरले आहे. दरम्यान गुरूवारी जिल्हाभरात एकूण ५६ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. चामोर्शी येथे आठवडी बाजाराचा दिवस असताना सुध्दा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. मेडिकल वगळता चामोर्शी शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती.औषधी दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने व बाजारपेठ पूर्णत: बंद होती. गुरूवारी प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांची रॅपिड टेस्ट केली. सकाळपासूनच तपासणीला सुरूवात झाली. येथील अंगणवाडीत दिवसभरात एकूण १०२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी २८ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. अगोदरचे १७ व गुरूवारी निघालेले २८ असे मिळून एकूण ४४ व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. उर्वरित व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार संजय गंगथळे यांनी दिली.संपर्कातील १४ जणांचे विलगीकरणसिरोंचा : सिरोंचा येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ३० जणांपैकी १४ जणांना २६ आॅगस्ट रोजी बुधवारला आरोग्य विभागाच्या वतीने संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. आणखी संपर्कातील १६ जणांचा शोध सुरू आहे. या १६ जणांना गुरूवारी क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती सिरोंचातील तालुका आरोग्य अधिकारी मनोहर कन्नाके यांनी दिली. नगरम मार्गावरील धर्मपुरी गावाजवळील शासकीय आश्रमशाळेत या १४ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ३० जणांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. सिरोंचा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.विविध ठिकाणच्या रूग्णांचा समावेशगडचिरोली : चामोर्शी शहराच्या प्रतिबंधीत क्षेत्रातील बुधवारी सायंकाळच्या सुमारास १६ व गुरूवारी नवीन २७ असे एकूण ४४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले व इतर ठिकाणी १२ असे एकूण ५६ नवीन कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आले. चामोर्शी येथील एक लॅब कामगारही बाधित झाला आहे. अहेरी येथील विलगीकरण कक्षात ४, गडचिरोली येथील ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये ब्रह्मपुरी येथून आलेला १, सर्वोदय वार्डातील २, बुलढाणा येथून आलेला १ प्रवासी व सामान्य रूग्णालयातील १ रूग्ण आदींचा समावेश आहे. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील दोन एसआरपीएफ जवान व कुरखेडातील एक दुकानदार कोरोनाबाधित आढळून आला आहे. आष्टी व आरमोरी येथील एक-एक रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील क्रियाशील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५२ झाली आहे. एकूण बाधित ९९२ रूग्णांपैकी ८३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या