शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महिनाभरात विद्यापीठाच्या संपूर्ण जमिनीचे अधिग्रहण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:25 IST

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला १०० एकर जागेची आवश्यकता आहे. सदर जमीन खरेदीसाठीचा निधी विद्यापीठ प्रशासनाला यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांच्या खासगी मालकीची जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया हातात घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या हालचाली वाढल्या : शेतकऱ्यांकडून जमिनीचे दस्तऐवज घेण्यास प्रारंभ; संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व्यस्त

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाला १०० एकर जागेची आवश्यकता आहे. सदर जमीन खरेदीसाठीचा निधी विद्यापीठ प्रशासनाला यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांच्या खासगी मालकीची जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया हातात घेण्यात आली आहे. आतापर्यंत विद्यापीठाच्या नावाने ३५ एकर जागा झाली आहे. उर्वरित ६५ एकर जमीन येत्या १० जानेवारी २०१९ पर्यंत मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करून या जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठीचे नियोजन झाले आहे व त्या दिशेने विद्यापीठासह प्रशासनाची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान खासगी शेतजमीन खरेदी करून अधिग्रहण करण्यासाठी संबंधित शेतकºयांचे शेतीजमिनीबाबतचे संपूर्ण दस्तावेज घेण्यास विद्यापीठ प्रशासनाने सुरूवात केली आहे.स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज सध्या कोटगल मार्गावरील इमारतीतून सुरू आहे. विद्यापीठाचा आवाका व कामाचा विस्तार बघता सदर इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे विद्यापीठात विविध कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम व इतर सर्व भौतिक सुविधा निर्माण होण्याच्या उद्देशाने १०० एकर जागेची मागणी लावून धरण्यात आली. यासाठी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून कोट्यवधींचा निधी काही महिन्यांपूर्वीच विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. आरमोरी मार्गावरील गोगाव, अडपल्ली परिसरातील १०० एकर जागा विद्यापीठाने बघितली आहे. यापैकी विद्यापीठ व इतर प्रशासकीय विभागाने मुल्यांकन व अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करून १०० पैकी ३५ एकर जमीन विद्यापीठाने आपल्या खात्यात जमा केली आहे. आता उर्वरित ६५ एकर जमीन १० डिसेंबर २०१९ पर्यंत मूल्यांकन व अधिग्रहणाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडून ही जमीन ताब्यात घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. जागेअभावी गडचिरोली येथील विद्यापीठ चंद्रपूर जिल्ह्यात जाऊ नये, अशी आग्रही मागणी गडचिरोली जिल्ह्यातील सिनेट सदस्यांसह शिक्षण संस्था चालकांनी केली आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून मागास गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर हे आग्रही आहेत. विद्यापीठासाठी आवश्यक असलेल्या जागेचे लवकरात लवकर अधिग्रहण होऊन ही जमीन विद्यापीठाच्या ताब्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकाºयांसह विद्यापीठाने कार्यवाही गतीने हाती घेतली आहे.१४ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा बैठकविद्यापीठ प्रशासनाने ३५ एकर खासगी जागेचे मुल्यांकन करून या जमिनीचे अधिग्रहण केले. मात्र सदर अधिग्रहण प्रक्रिया चुकीची झाली असून काही शेतकºयांना विद्यापीठाने त्यांच्या जमिनीसाठी अधिक भाव दिला, असा आक्षेप काही सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या बैठकीत घेतला होता. या आक्षेपाचे निरसन करून सदर भूमीअधिग्रहण प्रक्रिया नियमानुसार व योग्यरित्या करण्यात आल्याचे सांगण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सोमवार १० डिसेंबर रोजी संबंधित सिनेट सदस्य तसेच चौकशी समितीच्या सदस्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, सहायक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, नगर रचनाकार बारई, सहायक दुय्यक निबंधक भाऊ झाडे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, अभियंता दादा अंबागडे उपस्थित होते. दरम्यान या बैठकीतील चर्चेदरम्यान प्रा. प्रमोद शंभरकर, अजय बदकमवार व देवेश कांबळे सिनेट सदस्यांनी मुल्यांकनाबाबतचे काही दस्तावेज मागितले. मात्र हे दस्तावेज वेळेवर उपलब्ध झाले नसल्याने पुन्हा १४ डिसेंबरला बैठक बोलाविली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ